Ramlala In Foreign Media: परदेशातील मीडियाला कसा वाटला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा; Pak-US मीडियाने कसं केलं कव्हरेज

Foreign Media Pran Pratishtha Coverage : भारतीय माध्यमांमध्ये अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या बातम्या गेल्या पंधरवड्यापासून येत आहेत. राम मंदिर आणि प्रभू राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा सोहळा फक्त भारतापूरता मर्यादित नव्हता. अख्या जगातील माध्यमांनी या कार्यक्रमाची दखल घेतली.
Ramlala In Foreign Media
Ramlala In Foreign MediaANI

Foreign Media Coverage Of Ramlala Pran Pratishtha :

जवळपास ५०० दशकांपासून रामलल्लाची प्रतीक्षा हिंदू समाजाला होती, आज अखेर ती प्रतीक्षा संपली. आज प्रभू राम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा स्थापनेचा कार्यक्रम पार पडला. तब्बल ११ दिवस चालू असलेल्या पूजा-विधीनंतर रामलल्ला मंदिरातील गर्भगृहेत विराजमान झाले. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अख्या जगातील हिंदू समाजाने पाहिला आणि साजरा केला. या सोहळ्याचं वार्तांकन भारतासह परदेशी मीडियातही मोठ्या प्रमाणात झालं. परंतु नेमकं कोणत्याप्रकारे हे वार्तांकन झालं हे आपण जाऊन घेऊ..(Latest News)

पाकिस्तानी मीडियाने राम मंदिराबाबत काय म्हटलं

पाकिस्तानच्या आघाडीचा मीडिया ग्रुप डॉनने राम मंदिराच्या उद्घाटनाला लीडस्टोरी करत त्याचे कव्हरेज केलं. भारताच्या राजकारणातील विरोधी पक्ष या कार्यक्रमापासून कसं दूर राहिलं ते डॉनने सांगितलं. तसेच या कार्यक्रमासाठी चित्रपट कलाकार, क्रिकेटपटू आणि आघाडीचे उद्योगपती अयोध्येत गेल्याचं सांगितलं. डॉन या वृत्तसंस्थेने अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्याचं सांगत मुस्लिम लोकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डॉनच्या वृत्तानुसार, हिंसाचाराच्या भीतीने मुस्लिम लोकांनी आपली मुलं आणि महिलांना शेजारच्या शहरांमध्ये नातेवाईकांकडे पाठवल्याचं वृत्त या माध्यमाने चालवले आहे. या कार्यक्रमाला लोकसभा निवडणुकीशी जोडण्याचा प्रयत्नही या वृत्त वाहिनीने केला.

अमेरिकन मीडियाने काय लिहिले?

अमेरिकेच्या द वॉशिंग्टन पोस्टने लिहिले की, २२ जानेवारीला अयोध्येत हिंदू राष्ट्रवादी प्रतिज्ञा पूर्ण झाली. एनबीसी न्यूजने लिहिलं की, अयोध्येचा कायापालट करून ते पर्यटन स्थळ बनवण्यात हे मंदिर महत्त्वाची भूमिका बजावेल. एबीसी न्यूजने लिहिले की, भारताप्रमाणेच मॉरिशसमध्येही राम मंदिराच्या अभिषेकवेळी हिंदू सरकारी कर्मचाऱ्यांना दोन तासांची सुट्टी देण्यात आली होती. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे की, उत्तर भारतातील वादग्रस्त भूमीवर हिंदू धर्मस्थळाचा उदय हे भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी केलेल्या बहुसंख्य वादाचं प्रतीक असल्याचं म्हटलं आहे.

ब्रिटीश मीडिया काय म्हणते राम मंदिरावर

राम मंदिराच्या उद्घाटनाला ऐतिहासिक असल्याचे सांगत , ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांनी त्यांच्या घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये दिवे लावून दिवाळीसारखा सण साजरा केला. ब्रिटीश वृत्तसंस्था रॉयटर्सने लिहिले की, राम मंदिराच्या उद्घाटनाचे हे ऐतिहासिक क्षण आहेत. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांनी त्यांच्या घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये दिवे लावून दिवाळीसारखा सण साजरा केला.

गार्डियन या वृत्तसंस्थेने लिहिले की, भारतात दोन ते तीन महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. यामध्ये मोदी आणि त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा सरकारमध्ये येण्याचा प्रयत्न करेल. बीबीसी वर्ल्ड या वृत्तसंस्थेने लिहिले की, 'अयोध्येतील राम मंदिर १६ व्या शतकात बांधलेल्या मशिदीची जागा घेईल, जी १९९२ मध्ये हिंदूंच्या जमावाने उद्ध्वस्त केली होती.

Ramlala In Foreign Media
PM Suryoday Yojana: श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर PM मोदींची मोठी घोषणा; १ कोटी लोकांना मिळणार गिफ्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com