Maharashtra Live News Update: भाजपने एमआयएमबरोबर युती केली, हिंदुत्वाचं काय? - उद्धव ठाकरे

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६, महापालिका निवडणूक प्रचाराचा धुरळा, राज-उद्धव यांची संयुक्त मुलाखत, राज्यात थंडी परतली, राज्यातील राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, भाजप, शिवसेना, मनसे, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

भाजपने एमआयएमबरोबर युती केली, हिंदुत्वाचं काय? - उद्धव ठाकरे 

उद्धव ठाकरे भाषणाचे मुद्दे -

मी काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं

- भाजपाने एमआयएम बरोबर युती केली मग काय....

- मिंदे आपलाच गद्दार मात्र गणेश नाईक आरोप करत आहे भाजपाने परवानगी दिली तर शिंदेंचा टांगा उलटा करतो...

भाजप पक्षाला 2026 मध्ये पोरं दत्तक घ्यावी लागतात - राज ठाकरे

नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींनी घेतली राज ठाकरे यांची भेट

- पर्यावरण प्रेमींनी घेतली राज ठाकरे यांची भेट

- नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर पर्यावरण प्रेमींच्या शिष्टमंडळाने घेतली राज ठाकरे यांची भेट

- तपोवनातील वृक्षतोड, कपिला नदी अतिक्रमण यासंदर्भात केली दहा मिनिटे चर्चा

- राज ठाकरेंनी पर्यावरणप्रेमींसोबत असल्याचं दिल आश्वासन

अखेर अकोट नगरपालिकेत एमआयएमच्या 5 नगरसेवकांचा स्वतंत्र गट

आधी एमआयएम सहभागी झाली होती भाजपच्या नेतृत्वाखालील 'अकोट विकास मंचा'त. मात्र, भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या एमआयएम समावेशाच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज. तर एमआयएमच्या नगरसेवकांच्या निर्णयावर पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसीही रागावले. त्यानंतर एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी भाजपच्या नेतृत्वाखालील 'अकोट विकास मंचा'तून बाहेर पडण्यासाठी दिलं पत्र. त्यानंतर आज एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी आपला स्वतंत्र गट निर्माण करण्यासाठी दिलं जिल्हाधिकारी वर्षा मिना यांना पत्र. अकोला जिल्हाधिकार्यांनी एमआयएमच्या गटाला दिली मंजूरी. त्यामूळे आता अकोट नगरपालिकेत एमआयएमचे असेल स्वतंत्र अस्तित्व. आफरीन अंजूम शरिफोद्दीन आता एमआयएमच्या अकोट नगरपालिकेतील गटनेत्या.

शिरपूर पोलिसांकडून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत, एक संशयित अटकेत तर एक विधीसंघर्शीत ताब्यात

शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन वेगवेगळ्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत 1 लाख 28 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत, या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे,

महापालिका निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पिंपरी चिंचवड शहरात पहिलीच जाहीर सभा

महापालिका निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पिंपरी चिंचवड शहरात आज पहिलीच जाहीर सभा होत आहे. प्रभाग क्रमांक 22,23, आणि 27, 28 या प्रभागातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे या रहाटणी येथील कापसे यांच्या लॉन या ठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. या सभेत पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांना काही प्रति उत्तर देणार का याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

विक्रोळी पुर्व येथील मिलन शॉपिंग सेंटरला लागून असलेल्या मीटर बॉक्सला लागली भीषण आग

विक्रोळी पुर्व स्टेशन रोड नंबर एक येथील लगत असलेल्या मिलन शॉपिंग सेंटरला लागून असलेल्या मीटर बॉक्स ला शॉक सर्किट मुळे लागली भीषण आग घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल या आगीत कोणीही जखमी नसून आगीवरती नियंत्रण अग्निशमन दलाने मिळवलेले आहे

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज

मतदान केंद्रांसाठी 26 हजार कर्मचारी आणि जवळपास 4 हजार 100 पोलिसांच्या बंदोबस्तात होणार पुण्यात मतदान होणार आहे. तर पुण्यात 31 निवडणूक व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यात 41 प्रभागांमध्ये निवडणूक होणार आहे. तर 1 हजार 155 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर यापैकी 2 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले असून एकूण 1 हजार 153 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

पुणे शहरात एकूण 906 संवेदनशील मतदान केंद्र,या केंद्रांसाठी वेगळा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी आदर्श मतदान केंद्र उभारण्यात येणार असू मतमोजणीसाठी एकूण 15 केंद्र तयार करण्यात येणार आहेत. 15 केंद्रांवर 1हजार 100 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी होणार

वाशिमच्या रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात महिलेच्या डोक्यावर दगड घालून हत्या

वाशिमच्या रेल्वे स्टेशन परिसरात एका अज्ञात 40 ते 45 वर्षीय महिलेची डोक्यावर दगड घालून हत्या केल्याचा प्रकार दुपारच्या दरम्यान उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.

वाशिम रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात दुपारी एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. ही माहिती वाशिम पोलिसांना मिळताच तात्काळ वाशिम पोलीस घटनास्थळी हजर होत,डॉग स्कॉड पाचारण करण्यात आले. दरम्यान डॉग स्कॉड हैदराबाद – अकोला मार्गापर्यंत पोहचू शकले.

या महिलेची अद्याप ओळख पटली नसून, या महिन्याच्या डोक्यात दगड घालून या महिलेची हत्या करण्यात आली असून, या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता व्यक्त केला जात आहे. या हत्येच्या तपासा करिता वाशिम शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा तपास करत असून,मृत महिलेच्या हातावर छाया मोहन अस नाव आढळून आलं आहे, ही मृत महिला बाहेर जिल्ह्याची असल्याची प्राथमिक माहिती आहे

महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात

महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात

4011 मतदान केंद्र महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी असणार

13, 882 मतदान यंत्र द्वारे १५ ठिकाणी मतमोजणी होणार

बाबुराव सणस मैदान शरदचंद्र पवार अकॅडमी टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूल धनकवडी यासह पंधरा वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी होणार

नवी मुंबईत आचारसंहितेच्या काळात १६.१६ लाखांची रोख रक्कम जप्त

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेकडून ९ ठिकाणी एकूण ३ सत्रांत २७ स्थिर संनिरीक्षण पथके (SST) कार्यरत आहेत.

या कारवाईदरम्यान आज दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १२.३५ वाजता वाशी येथील अरेंजा कॉर्नर परिसरात वाहन क्रमांक MH 43 BG 0002 (पांढरी मर्सिडीज कार) याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अंदाजे १६ लाख १६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय- सुनील तटकरे

राऊत साहेबांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. अलीकडच्या काळामध्ये संजय राऊत यांच्यावर फार मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. मी त्यांच्याबद्दल अधिकचं बोलू नये, जनतेमधून पाठबळ शून्या वरती येतं, त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य होत असतात. त्यामुळे संजय राऊत यांच्या वक्तव्याला फार गांभीर्याने घेण्याची जरुरत नाहीये, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटक म्हणालेत.

गोवंशांची कत्तल करणाऱ्या रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांची भंडाऱ्यात पोलिसांनी काढली धिंड

गोवंशांची कत्तल करून त्यांचं मांस विक्री करणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील दोन अटल गुन्हेगारांची भंडाऱ्यात पोलिसांनी धिंड काढली. भंडारा शहरातील बैरागी वाडा आणि सौदागर मोहल्ला परिसरात राहणारे अट्टल गुन्हेगार मागील अनेक वर्षांपासून गोमांस कत्तल आणि विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्यावर कारधा पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. परवेज खान पठाण (32), आजीम कुरेशी (35) आणि असलम शेख अजिज शेख (45) असं पोलिसांनी काढलेल्यांची नावं आहे. कारधा पोलीस ठाण्यातून ही धिंड काढून भंडारा शहराच्या प्रमुख मार्गानं काढण्यात आली.

कोकण रेल्वे मार्गावरील दिवा–सावंतवाडी रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

कोकण मार्गावर प्रवाशांचा मोठा ओघ असलेल्या दिवा–सावंतवाडी रेल्वेच्या वेळापत्रकात 12 जानेवारी पासून महत्त्वाचे बदल लागू करण्यात येणार आहेत. नव्यावर्षात आता सुधारित वेळापत्रकानुसार दिवा–सावंतवाडी एक्सप्रेस ही 10 ते 15 मिनिटे आधी म्हणजेच सकाळी 6 ते 6.15 दरम्यान दिवा स्थानकातून सुटणार आहे. याशिवाय या एक्सप्रेसच्या मार्गावरील इतर स्थानकांच्या वेळांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

पनवेल, रोहा, चिपळून, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ या स्थानकांवर ही गाडी आता वेळेच्या 10 ते 15 मिनिटे आधी पोहोचणार आहे. तर सावंतवाडीवरून दिव्याच्या परतीच्या प्रवासाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ही गाडीही आता पूर्वीपेक्षा 10 ते 15 मिनिटे आधी धावणार असून, यामुळे परतीच्या प्रवासातही वेळेची बचत होणार आहे. या बदलांची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रक 12 जानेवारीपासून लागू होणार आहे.

Pune: पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो

पुणे -

पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो

पुण्यातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांचा रोड शो

Raigad: मुंबई- गोवा महामार्गावर ओरोस येथे कारचा भीषण अपघात

मुंबई- गोवा महामार्गावर ओरोस येथे कारचा भीषण अपघात

या अपघातात इचलकरंजी कोल्हापूर येथील एक व्यक्ती जखमी झाला आहे.

त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ही कार गोव्याच्या दिशेने जात होती. यावेळी कारमध्ये चालक एकटाच होता.

सदर कार भरधाव वेगात असताना ती डाव्या दुभाजकावर आदळून विरुद्ध कणकवलीच्या दिशेने जाऊन पलटी झाली.

यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Kolhapur: हसन मुश्रीफ यांचा पुन्हा एकदा सतेज पाटील यांना इशारा

कोल्हापूर -

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचा पुन्हा एकदा काँग्रेस नेते सतेज पाटील यांना इशारा

मी काल ही सांगितले..., अजूनही वेळ गेलेली नाही.... काँग्रेस पक्षाने आपले सर्व उमेदवार मागे घ्यावे...

आम्ही त्यांना स्टँप वर लिहून देतो की कोल्हापूर शहराचा विकास आणि स्वर्ग केल्याशिवाय आम्ही राहणार नाही

काँग्रेसचे नेते काल बस मधून फिरत होते, बरं झालं त्यांना KMT बसची अवस्था कळाली

राजेश क्षीरसागर यांनी KMT च्या कर्मचाऱ्यांना पर्मनंट केले

पर्मनंट केलेल्या कर्मचाऱ्यांच्या KMT मधून फिरण्याची त्यांना संधी मिळाली

मी त्यांना एवढी सूचना करेन की निवडणुका झाल्यानंतर सुद्धा केमटी मधून फिरा

एक दिवस फिरून स्टंट करण्यापेक्षा सामान्य माणसाची दुःख समजून घ्या

Nashik: नाशिकमध्ये लाडक्या बहिणींना साद घालण्यासाठी महिला स्टार प्रचारक मैदानात

नाशिक -

- महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच पक्षांकडून प्रचाराला वेग

- लाडक्या बहिणींना साद घालण्यासाठी महिला स्टार प्रचारक मैदानात

- भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचा आज नाशिकमध्ये ठिकठिकाणी रोड शो

- रोड शो आणि रॅलीच्या माध्यमातून चित्रा वाघ यांच्याकडून भाजप उमेदवारांचा प्रचार

कल्याणमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन जाहीर सभा

प्रचाराला अवघे काही दिवस राहिल्या असतानाच सर्व पक्षांनी सभा घ्यायला सुरुवात केली आहे कल्याण मध्ये देखील आज संध्याकाळी कल्याण पूर्व आणि पश्चिम मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे या सभेची जय्यत तयारी देखील सुरू आहे

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जाहीरनाम्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत प्रकाशन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगलीच्या मिरजेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची जाहीर सभा पार पडले.

मिरज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन देखील यावेळी अजित उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पार पडलं.

एकनाथ शिंदे यांची आज पुण्यात पहिली सभा

एकनाथ शिंदे यांची आज पुण्यात पहिली सभा

कात्रज भागात एकनाथ शिंदे यांची सभा

पुण्यातील दुसरी सभा एकनाथ शिंदे यांची नाना पेठेत होणार

पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार

राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार अमोल बालवडकर यांचे गुंड निलेश घायवळ सोबतचे व्हिडिओ सोशल मिडिया वर व्हायरल

अमोल बालवडकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला

बालवडकर यांच्याकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले असं असतानाच आता हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या श्रावणी व साहिलने पटकावले सुवर्णपदक

छत्रपती संभाजी नगर येथे सुरू असलेल्या ६९ व्या नेशनल स्कूल गेम्समध्ये नाशिकच्या मनमाडची वेटलिफ्टिंगपटू श्रावणी विजय पुरंदरे हिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत ५३ किलो वजनी गटात १४५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले तर साहिल यादवराव जाधव याने ७९ वजनी गटात २६९ किलो वजन उचलत चुरशीच्या लढतीत सुवर्णपदक पटकावले.त्यांच्या यशाने मनमाड मध्ये त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

गडचिरोली नगर परिषदेवर निवडून आलेल्या भाजपच्या युवा नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी वाजतगाजत दाखल होऊन पदभार स्वीकारला. यावेळी भाजपचे निवडणूक प्रभारी आमदार बंटी भांगडिया यांच्यासह भाजपचे आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या जावयावर उधळल्या नोटा

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या जावयावर उधळल्या नोटा

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

पैशाची उधळण केल्याने चर्चेला उधाण आले आहे

नागपूरमधील सावनेर आणि खापामध्ये वाळू व्यवसायिकांवर ईडीच्या टीमकडून छापेमारी

नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि खापामध्ये वाळू व्यवसायिकांवर ईडीच्या टीमकडून छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती (मुंबईची टीम असल्याची माहिती)

2021 च्या मध्ये काही वाळू व्यवसायिकांवर शासनाची वाळू संदर्भातील रॉयल्टी चुकून वाळू व्यवसाय केल्याचा आणि कोट्यवधी रुपयांची वाळू विकल्याचा गुन्हा नागपूर पोलिसांनी दाखल केला होता..

त्याच अनुषंगाने या रॉयल्टी चुकून वाळू व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ईडीने वारंवार चौकशीसाठी बोलावले होते..

मात्र चौकशीत सहकार्य न केल्यामुळे आज इडीचे छापे नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असल्याची माहिती आहे...

Gondia: गोंदियातील खडकी येथे बिबट्याचा थरार,चार वर्षांच्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बिबट्याने चार वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला करून त्याला घरातून उचलून नेले, या हल्ल्यात त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव हियांश शिवशंकर रहांगडाले (वय ४) असे आहे.

Amravati: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर

महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी अजित पवारांची प्रचार सभा...

दुपारी चार वाजता संत गाडगेबाबा समाधी मंदिर समोरील प्रांगणात अजित पवारांची सभा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता अजित पवारांची अमरावती जाहीर सभा..

पुणे जिल्हा परिषदेचे भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेंनी घेतली अजित पवारांची भेट

पुणे जिल्हा परिषदेचे भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आणि गटनेते माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेंनी अजित पवारांची भेट घेतलीय

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद बुट्टे भाजपाला रामराम करणार असल्याची चर्चा

शरद बुट्टे जिल्हा परिषद सदस्य,गटनेता आणि जिल्हाध्यक्ष म्हणुन भाजपात काम केलं

मात्र जिल्हा परिषद गटात निधी मिळत नसल्याने पुढील काळात मतदार संघात निधी मिळावा म्हणुन हि भेट घेतल्याचे सांगतात

शरद बुट्टे भाजपाला रामराम करुन लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची सुत्र्यांची माहिती

मात्र युतीतील एकमेकांचे पक्षांतील प्रवेश घ्यायचे नाही असा अलिखित नियम यावेळी लागु होईल का हेही पहावं लागणार

Pune: पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांचे गुंड निलेश घायवळ सोबतचे व्हिडिओ सोशल मिडिया वर व्हायरल

अमोल बालवडकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला

बालवडकर यांच्याकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले असं असतानाच आता हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

गुंड निलेश गायवळ याला विदेशात पाठवण्यासाठी भाजप ने मदत केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता

आता विरोधकांकडून बालवडकर यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कारवाईचा बडगा.

सोलापूर महानगरपालिकेच्या मतमोजणी पर्यंत 53 जणांना केलं तडीपार..

सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले आदेश..

महानगरपालिकेची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशांवर करण्यात आली कारवाई..

शहरातील 53 जणांना 8 जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंत निवडणूक कार्यक्षेत्रातून तडीपार केले.

ज्यांच्यावर दोन पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे त्यांच्यावर करण्यात आली कारवाई.

फौजदार चावडी 15, एमआयडीसी 10, जोडभावी 3, सदर बाजार 11, सलगर वस्ती मधील आठ समावेश असणारे विरोधात तडीपारचे आदेश काढले.

15 जानेवारी रोजी मतदानासाठी तडीपार आरोपींना दोन तासाची सूट असणार..

घोडबंदर रोडवर भीषण अपघात; ५-६ गाड्या एकमेकांना धडकल्या

घोडबंदर रोडवर भीषण अपघात

⁠पाच ते सहा गाड्यांमध्ये समोरा समोर झाली टक्कर

⁠गाड्यांचे मोठे नुकसान

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात झाला भीषण अपघात

⁠सकाळी ७ च्या सुमारास घडली घटना

यामुळे घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी

सुदैवाने या अपघातात कोणतिही जिवितहानी झाली नाही.. वाहतूक कोंडी दुर करण्यासाठी पोलिस करत आहेत प्रयत्न..

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर ९ ते १३ जानेवारी दरम्यान वाहतूक विस्कळीत

समृद्धी महामार्गावर ९ ते १३ जानेवारीदरम्यान वाहतूक व्यत्यय

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (HTMS) अंतर्गत 'गँट्री' (लोखंडी सांगाडे) बसवण्याचे काम हाती घेतले आहे.

कामासाठी दररोज ४५ मिनिटे ते १ तास वाहतूक थांबवली जाणार.

काही वेळ वाहतूक पूर्णपणे बंद, तर काही वेळ संथ गतीने सुरू, नागपूर–मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना फटकाएकूण १० टप्प्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यांत काम, समृद्धी महामार्गावरील ९०+५०० ते १५०+३०० किमीचा टप्पा प्रभावित

एकूण १० टप्प्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, वाहनचालकांनी प्रवासाचे वेळापत्रक आधीच ठरवण्याचे आवाहन

पर्यायी मार्ग किंवा अतिरिक्त वेळ राखून ठेवण्याचा सल्ला

Vishwajit Kadam: एमआयएम युतीमुळे भाजपाचा खरा आणि दुटप्पी चेहरा समोर आला - आमदार विश्वजीत कदम

एमआयएम युतीमुळे भाजपाचा खरा आणि दुटप्पी चेहरा समोर आल्याची टीका काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी भाजपावर केली आहे.तसेच मुख्यमंत्र्यांच्या अकोला येथील भाजपचे आमदार नेते ऐकत नाहीत,का ? असं सवाल देखील विश्वजीत कदम यांनी यावेळी उपस्थित केलाय. अकोल्याचा अकोट महानगरपालिकेत भाजपा आणि एमआयएमने केलेल्या युतीवरून काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी भाजपावर ही टीका केली आहे,ते सांगली मध्ये बोलत होते.

कोरेगाव-भीमा हिंसाचाराची चौकशी करण्याचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयातच

उद्धव ठाकरे यांचे आयोगात प्रतिज्ञापत्र सादर

चौकशीची मागणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठवलेले पत्र सध्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर केले सादर

आपण आता मुख्यमंत्री पदावर नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर किंवा आयोगाने या पत्राची मागणी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाकडे करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी या प्रतिज्ञापत्रात केले नमूद

ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फेत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे

देवळाली कॅम्प येथील कॅथे कॉलनीत पोलिसांचा छापा, ४८७ ग्रॅम अँम्फेटामाइन ड्रग्ज पावडर जप्त

देवळाली कॅम्प येथील जप्त ड्रग्जची अंदाजे किंमत २३ ते २४ लाख रुपये

अमली पदार्थ विक्रीच्या संशयातून पितापुत्रासह तिघांना अटक

मिलिटरी गेटसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज साठा आढळला

फॉरेन्सिक तपासणीत पांढरी पावडर ‘अँम्फेटामाइन’ असल्याची पुष्टी

लष्करी अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

आरोपींच मागील दोन वर्षांपासून लष्करी हद्दीजवळ वास्तव्य असल्याची माहिती

आरोपींनी ड्रग्ज कुठून आणलं, आणखी साथीदार कोण? याचा पोलिस तपास सुरू

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल, तिघा आरोपींना १२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

Tuljabhavani: तानाजी सावंतांविरोधात गुन्हा दाखल करत,कायदेशीर कारवाई करा,तुळजापुरातील पुजारी आक्रमक

माजी मंत्री आ.तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.तानाजी सावंताविरोधात तुळजापुरातील पुजारी आक्रमक झालेत. तानाजी सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी पुजाऱ्यांनी केली.त्याबाबत जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांना निवेदन दिले.दोन दिवसांपूर्वी जिल्हापरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या मेळाव्यानंतर तानाजी सावंत यांनी तुळजापूरात ड्रग्ज प्रकरणातील आरोपी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिला,आता मातेचा प्रसादा देण्याऐवजी येणाऱ्या भक्तांना ड्रग्जची एक पुडी दिली जाईल अस वक्तव्य केलं होतं.त्यावरूनच पुजारी आक्रमक झालेत.तसेच जाहीर सभेत तानाजी सावंतांनी तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याच्या पवित्रतेवरही संशय निर्माण केला म्हणत पुजाऱ्यांनी तानाजी सावंतांविरोधात गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तसेच तानाजी सावंत यांनी चूक मान्य करत जाहीर माफी मागावी अशीही मागणी करण्यात आली.

Pune Weather: राज्यातील सर्वाधिक थंडी पूर्ण शहरात, पारा ९.५ अंशावर

पुणे शहराचा पारा ९.५ अंशावर

विश्रांती घेतलेल्या थंडीने राज्यात पुन्हा केली "एन्ट्री"

पुण्या पाठोपाठ विदर्भात सुद्धा पारा घसरला

उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात किमान तापमानात घट

राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (किमान तापमान)

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात

कात्रज चौकातून एकनाथ शिंदे यांचा रोड शो तर दुपारी नाना पेठेत जाहीर सभा

पिंपरी चिंचवड मध्ये ही एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहे

पुण्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वतंत्र लढत आहे

त्यामुळे शिंदे सभेतून काय बोलणार याकडे लक्ष

Bhaskar Jadhav: निवडणुका बिनविरोध करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव, भास्कर जाधवांचा आरोप

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाच्या उमेदवारा करता समीर बागवान आणि विशाल विचारे यांच्या प्रचाराकरता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर हल्ला चढावला आहे

महाराष्ट्रातील निवडणुका आता निपक्षपाती राहत नसल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर राज्यात ६८ सत्ताधारी उमेदवार बिनविरोध, मात्र विरोधी पक्षाचा एकही उमेदवार बिनविरोध नाही, ही काय जादू? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

निवडणुका संपवून टाकण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला असून, पैसा आणि दमदाटीच्या जोरावर मते मिळवली जात आहेत, असे ते म्हणाले. ऑन कॅमेरा पैशांच्या बॅगा भरलेल्या दिसत आहेत, मग नोटबंदीनंतर इतक्या नोटा येतात कुठून? असा थेट प्रश्न त्यांनी पंतप्रधानांना केला.

लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही ताकदीने निवडणुका लढवत आहोत. सर्वसामान्य जनता जेव्हा उठेल, तेव्हा ही भ्रष्ट सत्ता उलथून पडेल, असा इशाराही भास्कर जाधव यांनी दिला.

Pune: पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येणार

पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उद्या जाहीरनामा होणार प्रसिद्ध

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणानंतर भाऊ बहीण पहिल्यांदाच एकत्र मंचावर

राष्ट्रवादी काँग्रेसचा सयुक्तिक जाहीरनामा होणार प्रकाशित

अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत होणार जाहीरनामा प्रकाशित

१० जानेवारीला होणार जाहीरनामा प्रकाशित

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असताना पहिल्यांदाच बहीण भाऊ एकाच राजकिय व्यासपीठावर दिसणार

Pune: 14 आणि 15 जानेवारीला मनपाची शहर बस सेवा 'आपली बस' बंद राहण्याची शक्यता

14 आणि 15 जानेवारीला मनपाची शहर बस सेवा 'आपली बस' बंद राहण्याची शक्यता

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बस सेवा बंद राहण्याची शक्यता

निवडणुकीसाठी 3004 बूथ वर 14 जानेवारीला कर्मचारी आणि मतदान साहित्य पोहचविण्यासाठी या बसेस वापरण्यात येणार

तसेच मतदानाच्या दिवशीही मनपाच्या 500 बसेस वापरण्याचा प्रस्ताव मनपा आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे

त्यामुळे 14 आणि 15 जानेवारीला नागपुरातील सार्वजनिक बस सेवा ठप्प राहण्याची शक्यता आहे.

मात्र मनपा आयुक्तांकडून या प्रस्तावाला अजून मंजुरी मिळायची आहे.

 Pune:  महापालिकेच्या प्रचारासाठी पुण्यातून दररोज 12 हेलिकॉप्टरचे उड्डाण

राज्यात महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी काही दिवसच शिल्लक असल्याने महत्त्वाच्या नेत्यांकडून हेलिकॉप्टरचा वापर वाढला

एका दिवसात दोन ते तीन ठिकाणच्या सभेला उपस्थिती लावायची असल्याने अनेक नेत्यांकडून हेलिकॉप्टरला प्राधान्य

पुण्यात आता दिवसाकाठी सुमारे 12 हेलिकॉप्टरची उड्डाणे होत आहेत

पुण्याहून सर्वाधिक वापर मुंबईला जाण्यासाठी होत आहे

मुंबई पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी जाण्यासाठी देखील हेलिकॉप्टरचा वापर

गेल्या महिन्याभरात रत्नागिरी RTO कडून कडक कारवाई

रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जोरदार कारवाई सुरु आहे गेल्या महीनाभरात २५५ वाहनांची तपासणी केली गेली यात ११ वाहने दोषी आढळली. त्यांच्याकडून १० हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या वाहन चालकांचा परवाना १८० दिवसांसाठी निलंबित करण्याबाबतची कार्यवाही प्रस्तावित आहे. वाहतुकीला लावण्याच्या दृष्टिकोनातून शिस्त तसेच अपघात रोखण्यासाठी चालू राहणार असल्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन तपासणी मोहीम यापुढेही अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिला आहे.

Pune: पुणे महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे -

महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात

4011 मतदान केंद्र महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी असणार

13, 882 मतदान यंत्र द्वारे १५ ठिकाणी मतमोजणी होणार

बाबुराव सणस मैदान शरदचंद्र पवार अकॅडमी टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूल धनकवडी यासह पंधरा वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी होणार

Nashik: बांगलादेशकडून कांदा आयातीवर निर्बंध, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

नाशिक -

- बांगलादेशकडून कांदा आयातीवर निर्बंध, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

- बांगलादेशाने भारतातून आयात होणाऱ्या कांद्यावर लावले निर्बंध

- कांदा आयातीसाठी नव्याने परवाने देणं केलं बंद

- आधी मंजूर केलेल्या आयात परवान्यावरील कांदा आयात ३० जानेवारीपर्यंतच सुरू राहणार

- बांगलादेशाने कांदा आयातीवर निर्बंध लादल्याने कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापार अडचणीत येण्याची शक्यता

- एकट्या नाशिकमधून दररोज तब्बल १,५०० टन कांद्याची बांगलादेशात होते निर्यात, कांद्याची कोट्यावधींची उलाढाल ठप्प होण्याची भीती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com