Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती

Parli Municipal Election Political Twist: बीडच्या परळीत नवं राजकीय समीकरण पाहायला मिळाले. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेने MIM सोबत युती केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती
CM Devendra Fadnavis and Deputy CM Ajit PawarSaam Tv
Published On

Summary -

  • परळी नगरपरिषदेत नवं राजकीय समीकरण उदयास

  • राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि एमआयएमची युती

  • गटनेतेपदी वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली

  • भाजपने स्वतंत्र गट स्थापन केला

योगेश काशिद, बीड

भाजपने एमआयएमसोबत युती केल्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. हे ताजे असतानाच आता बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. बीडच्या परळी नगरपरिषद निवडणुकीनंतर एक नवीन समीकरण पाहायला मिळत आहे. अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि एमआयएमने एकत्र येत युती केली. भाजपने स्वतंत्र गट स्थापन केला. परळीत राष्ट्रवादी- शिवसेनेने एमआयएमसोबत युती केल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

परळी नगरपरिषद निवड जिल्हाधिकारी बीड यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, मित्रपक्ष, अपक्ष - २ अशा २४ जणांचा समावेश आहे. या मित्र पक्षांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका आयेशा मोसिन शेख यांचा समावेश आहे. तर उर्वरित सदस्यांमध्ये अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदेसेना यांच्या नगरसेवकांचा समावेश आहे.

Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती
Ambernath Politics: मोठी बातमी! अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या मात्र या निवडणुकांमध्ये बीडच्या परळीमध्ये गटनेता निवडीच्या वेळेस शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एमआयएमने गटनेता निवडला असून यावेळी परळी नगर परिषदेमध्ये एमआयएमचा एक नगरसेवक निवडून आला आहे. याच नगरसेवकाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी हा पाठिंबा दिल्याचे सांगितले आहे.

Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती
Maharashtra Politics: 'ज्याने मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक, महापाप केलं तो महापौर', देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

त्याचबरोबर एमआयएमला सोबत घेतल्याने भाजपाने आपला वेगळाच गट निर्माण करून गटनेता निवडला असून याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'बीडच्या परळीतील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि एमआयएमची युती झाली असून राष्ट्रवादी नको नको म्हणणाऱ्यांनी परळीमध्ये एमआयएमसोबत हात मिळवणे केली आहे.'

Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती
Maharashtra Politics: भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातल्या मास्तरासारखी, राष्ट्रवादीच्या नेत्याची सडकून टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com