सांगलीत प्रचारसभेदरम्यान जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
पिंजरा चित्रपटातील मास्तराशी भाजपची अवस्था
शायरीतून भाजपवर खोचक टीका
भाजप-एमआयएम युतीवरही सवाल केले उपस्थित
'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातल्या मास्तरासारखी झाली.', अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली. सांगली महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. जयंत पाटील यांच्या या सभेतील भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
जयंत पाटील भाजपवर टीका करताना म्हणाले की, 'पिंजरा चित्रपटातील मास्तराची जशी अवस्था झाली होती तशी अवस्था भाजपची झाली आहे. त्या चित्रपटात मास्तरला तमाशाचा नाद लागला आणि मास्तरच तुणतुणे हातात घेऊन पुढे उभा राहायला लागला असंच भाजपचं झालं आहे.' यावेळी त्यांनी शायरीच्या माध्यमातून भाजपला खडेबोल सुनावले. 'ये बंद करणे आये थे, तवायफो की कोठी, मगर सिक्को खी खनक देख कर, खुद मुजरा कर बैठे', या शायरीतून जयंत पाटलांनी भाजपावर सडकून टीका केली आहे.
भाजपने एमआयएमसोबत युती केली यावर जयंत पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले की, भाजपवाले सांगतात की ते हिंदुत्ववादी आहे. अकोल्यात एमआयएमसोबत युती करतात. ओवैसींच्या मांडीला मांडी लावून बसतात. यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत हे लक्षात घ्या. सत्तेसाठी कुणाशीही आघााडी करायला यांना काहीच वाटत नाही. काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी निघालेला भाजप आता काँग्रेसमुक्त झाला आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.