Sangli : 'सगळ्यांना हाणलं नाही तर...' आव्हान खरे ठरले; जयंत पाटील यांचा ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम

Sangli Ishwarpur MLA Jayant Patil News : ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने २३ जागांवर विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला आहे. विजयानंतर संपूर्ण सांगली जिल्ह्यात बॅनर्स झळकत असून राजकीय चर्चा रंगली आहे.
Sangli : 'सगळ्यांना हाणलं नाही तर...' आव्हान खरे ठरले; जयंत पाटील यांचा ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम
Sangli Ishwarpur MLA Jayant Patil Saam Tv
Published On
Summary
  • ईश्वरपूर नगरपरिषदेत जयंत पाटील पॅनलचा मोठा विजय

  • २३ जागांवर दणदणीत यश, विरोधकांची रणनीती फसली

  • महायुतीच्या तगड्या नेत्यांचाही पराभव

  • विजयानंतर संपूर्ण सांगली जिल्ह्यात बॅनर्सची चर्चा

  • जयंत पाटील यांचा बालेकिल्ला पुन्हा शाबूत

विजय पाटील, सांगली

राजकीय वर्तुळात 'करेक्ट कार्यक्रम' करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला शाबूत राखत विरोधकांना धूळ चारली आहे. "क्या बडा तो सबसे दम बडा... आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव सांगणार नाही," या त्यांच्या गाजलेल्या आव्हानाची प्रचिती नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालातून आली आहे. याचेच पोस्टर ईश्वरपूर मध्ये लागले आहेत.

राज्यातील नगरपरिषद आणि नागरपंचायतींचे २१ डिसेंबर रोजी निकाल लागले. या निकालानंतर सांगलीच्या ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपासह महायुतीने तगडी फिल्डिंग लावली होती.

Sangli : 'सगळ्यांना हाणलं नाही तर...' आव्हान खरे ठरले; जयंत पाटील यांचा ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम
Accident : संभाजीनगरमध्ये कार- रिक्षाचा भीषण अपघात; दोघांनी जागीच सोडले प्राण; गरोदर महिला गंभीर तर बाळाचा पोटात मृत्यू

दिग्गज नेत्यांची फौज आणि रणनीती आखून पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. तर अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने २३ जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधकांची अक्षरशः हवा काढून घेतली.

Sangli : 'सगळ्यांना हाणलं नाही तर...' आव्हान खरे ठरले; जयंत पाटील यांचा ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम
Dhule : धुळे महापालिकेत महायुतीचा तिढा कायम! ७४ जागांसाठी रणसंग्राम, भाजपचा ५५ प्लसचा नारा, शिवसेना २१ जागांवर ठाम

विजयानंतर इस्लामपूर शहर आणि राजारामबापू कारखाना परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावले आहेत. यावर जयंत पाटील यांचे "सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही" हे वाक्य मोठ्या अक्षरात झळकत आहे. हे फलक सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com