Pune Swargate ST Depot Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Swargate ST Depot Case : धक्कादायक! माझ्यावर तिसऱ्यांदा अनैसर्गिक बलात्काराचा प्रयत्न, पीडितेची पत्राद्वारे व्यथा, त्या दिवशी शिवशाहीत काय घडलं?

Swargate ST Bus Depot Case : पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवले आहे. पीडितेने पाठवेल्या पत्रात आरोपी दत्ता गाडेने तिच्यावर तिसऱ्यांदा बलात्काराचा प्रयत्न केल्याचं उघड झाले आहे.

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Swargate Case Update : पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेनं पाठवेल्या पत्रात आरोपी दत्ता गाडे याने तिसऱ्यांदा तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचं उघड झालेय. दत्ता गाडे याने दोन वेळा बलात्कार केला, त्यानंतर तिसऱ्यांदा अनैसर्गिक बलात्काराचा प्रयत्न केल्याची व्यथा पीडित तरूणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली आहे.

२५ फेब्रुवारी रोजी पुण्यातील स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरूणीवर पहाटे बलात्काराची घटना घडली. या प्रकारानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला. घटनेचं गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला अन् दत्ता गाडे याला त्याच्या गावातून बेड्या ठोकल्या.

स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बस मध्ये माझ्यावर आरोपी दत्ता गाडे नावाच्या व्यक्तीने बलात्कार केला. मी सुरुवातीला आरडाओरडा केला त्यानंतर माझा आवाज खोल गेला, आवाजच निघत नव्हता व त्याचवेळी माझ्या मनात बलात्काराच्या विविध घटनांमध्ये विरोध केल्याने जखमी झालेल्या मुली, मारून टाकण्यात आलेल्या गोष्टी आल्या. मी जीव वाचविणे महत्वाचे मानले. त्याने दोनदा माझ्या इच्छेविरुद्ध बलात्कार केल्यानंतर तिसऱ्यांदा अनैसर्गिक लैंगिक जबरदस्तीचा प्रयत्न केला आणि तेव्हा पूर्ण ताकदीने विरोध केला होता. कदाचित दोनदा लैंगिक अत्याचार केल्याने तो पळून गेला.

स्वारगेट शिवशाही लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांची आज भेट घेतली. पीडित मुलीने प्रधान सचिवांना पत्र पाठवलेय. असीम सरोदे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करावे, पीडित मुलीचा पत्राद्वारे मागणी केली आहे. आरोपी दत्ता गाडे याने दोन वेळा बलात्कार केला असल्याचे पत्रात नमूद केले आहे. पूर्ण ताकतीने विरोध केल्यानंतर दत्ता गाडे याने पळ काढला असेही पीडितेने म्हटलेय. पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी इच्छा नसताना सुद्धा माझी वैद्यकीय चाचणी करायचे,असा दावाही पत्रात केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT