
योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी
सतीश भोसले उर्फ खोक्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तो बीड जिल्हा कारागृहामध्ये आहे. खोक्याला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. यातील एक निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचे काल सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले.
रणजित कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत अनेकांवर गंभीर आरोप केले. यामुळे बीडसह राज्यभरात खळबळ उडाली होती. आता रणजित कासले यांनी गुजरातमध्ये जाऊन एक कोटी रुपयांची मागणी करतानाचा आणि पैसे घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांचे काही फोटोग्राफदेखील समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ते बंदूक दाखवून दहशरत निर्माण करताना दिसत आहेत.
निलंबित पीएसआय रणजित कासले यांच्यावर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता गुजरातमध्ये जाऊन वसुली करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणासंदर्भात पैसे घेतलेले स्क्रीनशॉट गुजरातमधील एका न्यूज मीडियाच्या एक्स पोस्टवर शेअर करण्यात आले आहेत.
बीड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या रणजित कासलेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विनापरवानगी गुजरातमध्ये जाऊन पैसे मागणे आणि सायबर गुन्ह्याची भीती दाखवून पैसे उकळणे असे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहेत. या प्रकरणी दोषी आढळल्याने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी कासलेंवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.