Dattatray Gade

पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिरूर येथील दत्तात्रेय गाडे याला पोलिसांनी अटक केली आहे. २६ वर्षीय तरुणी पुण्याहून फलटणला जात होती. ती स्वारगेट बस डेपोमध्ये आली. तिच्यासोबत ओळख वाढवून तिला शिवशाही बसमध्ये नेलं. तिथं तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो पसार झाला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर दत्ता गाडे गायब झाला होता. या घटनेवरून राज्यात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पथकं रवाना केली होती. दत्ता गाडे हा शिरूरमधल्या गुनाट या गावात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर १०० पोलिसांचे पथक ड्रोनद्वारे ऊसाच्या शेतात त्याचा शोध घेत होते. २७ आणि २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com