Pune ST Bus  saam tv
मुंबई/पुणे

Pune ST Bus : एसटी बस कंडक्टरवर जीवघेणा हल्ला, लोखंडी रोडने मारहाणीचा प्रयत्न; पुण्यात भयंकर घडलं

Pune News : पुण्यात काही अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रोड घेऊन एसटी बस कंडक्टरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला स्थानिकांमुळे अयशस्वी ठरला आणि कंडक्टर सुखरुप बचावला.

Yash Shirke

  • पुण्यात एका एसटी बस कंडक्टरवर हल्ला

  • लोखंडी रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न

  • स्थानिक नागरिकांमुळे वाचले कंडक्टरचे प्राण

Pune : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव येथे एसटी कर्मचाऱ्यांवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका काही केल्या थांबत नाही आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार पुणे-अहिल्यानगर महामार्गावरच्या रांजणगाव जवळ घडला आहे. काहीजणांनी थेट लोखंडी रोड घेऊन एसटी बसच्या कंडक्टरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण या हल्ल्यात कंडक्टर थोडक्यात बचावला.

स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हल्लेखोरांच्या हल्ल्यातून एसटी कंडक्टर सुखरुप वाचला. तरीही या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रंदिवस प्रवाशांच्या सेवेसाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर असे हल्ले होणे चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चौकशी सुरु केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT