Pune Porsche Car Accident News Updates:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: ३ कोटीची पोर्शे २००च्या स्पीडने पळवली; IT इंजिनिअर तरुण- तरुणीचा करुण अंत, बिल्डरच्या लेकाला निबंध लिहण्याची शिक्षा!

Gangappa Pujari

पुणे, ता. २० मे २०२४

रविवार, (दिनांक. १९ मे २०२४) रात्री अडीच वाजताची वेळ. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका भरधाव पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरुण- तरुणीचा करुण अंत झाला. या भयंकर अपघाताने संपूर्ण पुणे शहर हादरुन गेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गाडी चालवणारा तरुण हा शहरातील एका प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा असून त्याला अवघ्या काही तासात जामीन मंजूर झाला.

२००चं स्पीड अन् थरारक अपघात

पुणे शहरात एका प्रसिद्ध बिल्डरच्या अवघ्या १७ वर्षाच्या मुलाने भरधाव कार चालवत दोन जणांचा बळी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली. अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी या अपघातात झालेल्या तरुण- तरुणीची नाव आहेत. हे दोघेही आयटी इंजिनिअर असून मुळचे मध्यप्रदेशचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

IT इंजिनिअर तरुण- तरुणीचा दुर्दैवी अंत

भरधाव कारने दिलेली धडक इतकी भीषण होती की, समोरील दुचाकीवरील मुलगी थेट हवेत उडाली तर मुलाच्या सर्व बरगड्या तुटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही आलिशान गाडी पुण्यातल्या ब्रह्मा कॉर्प कंपनीचे मालक विशाल अग्रवाल यांची असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी कार चालवणाऱ्या अग्रवाल यांच्या मुलाला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. मात्र अवघ्या काही तासातच त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

अल्पवयीन आरोपीला तात्काळ जामीन

अपघातावेळी अल्पवयीन मुलगा मद्यधुंद अवस्थेत होता. तो नुकताच पबमध्ये पार्टी करुन आपल्या मित्रांसह तब्बल २००च्या स्पीडने बेदरकारपणे गाडी पळवत घराकडे चालला होता, अशीही माहिती समोर आली आहे. मात्र न्यायालयाने आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगत त्याला तात्काळ जामीन मंजूर करुन दिला.

३०० शब्दात निबंध लिहण्याची शिक्षा

याबाबत मुलाचे वकील प्रशांत पाटील यांनी सांगितले की, न्यायालयाने तो अल्पवयीन असल्याने काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. जामीन देताना न्यायालयाने आरोपीला येरवडा वाहतूक पोलिसांसोबत १५ दिवस काम करण्यास सांगितले आहे, तसेच घडलेल्या अपघातावर ३०० शब्दात निबंध लिहिण्यासह दारू सोडण्यासाठी मदत करणाऱ्या डॉक्टरकडून उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.

पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, या मन सुन्न करणाऱ्या आणि तितक्याच संतापजनक घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. बेदरकारपणे, बेजबाबदारपणे मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या आरोपीविरोधात कडक कारवाई केली जावी, त्याच्या पालकांनाही याबाबत दोषी धरले जावे, अशी मागणी संतप्त पुणेकर करताना दिसत आहेत. यासंबंधी काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनीही आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तसेच यासंबंधी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अनेक पदाधिकारी पुणे पोलीस आयुक्त यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

Horoscope Today : धार्मिक कार्यावर पैसा खर्च होईल, मानसिक ताण जाणवेल; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT