Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसह कुटुंबीयांनी रांगेत उभं राहून केलं मतदान; म्हणाले, मते पैशानं विकत घेता येत नाहीत!

Maharashtra Loksabha Election Phase V Voting: मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे यांच्यासह शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी दोन्ही नेत्यांनीही मतदान करण्याचे आव्हान केले.
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसह कुटुंबीयांनी रांगेत उभं राहून केलं मतदान; म्हणाले, मते पैशानं विकत घेता येत नाहीत!
Maharashtra Loksabha Election Phase V Voting: Saamtv

मयुर राणे, मुंबई, ता. २० मे २०२४

मुंबई, नाशिक, ठाणे कल्याणसह राज्यातील १३ जागांसाठी लोकसभेचे मतदान होत आहे. मुंबईतील सर्वच मतदार केंद्रांवर सकाळपासूनच सामान्यांसह, बॉलिवूड सेलिब्रेटी, राजकीय नेत्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी 'देश जुमलाबाजीला कंटाळला आहे, पैशाने मत विकत घेता येत नाहीत,' असा टोला लगावत मतदान करण्याचे आवाहन केले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"सगळे मतदार जुमलाबाजीला त्रासलेले आहेत, कंटाळले आहेत. देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जास्तीत जास्त लोक बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क अबाधित राहावा, यासाठी यावेळी मतदान करतील. तसेच पैशाचा पाऊस लोक स्विकारणार नाहीत, पैसा घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही," असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मनसे अध्यक्षांचे ठाकरे स्टाईल आवाहन

"उन्हाळ्याचे दिवस आहेत, सकाळची वेळ आहे. संध्याकाळपर्यंत किती मतदान होते ते पाहू, मुंबईकर मोठ्या संख्येने मतदान करतील अशी आशा आहे, असे म्हणत तेच घिसापीटा वाक्य सांगतो मतदान करा," असे खास ठाकरे स्टाईल आवाहन मनसे अध्यश्र राज ठाकरे यांनी यावेळी केले.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसह कुटुंबीयांनी रांगेत उभं राहून केलं मतदान; म्हणाले, मते पैशानं विकत घेता येत नाहीत!
Pune Unseasonal Rain: अवकाळीच्या तडाख्याने भलेमोठे झाड कोसळले, ५ घरे जमीनदोस्त; चिमुकलीसह वृद्ध दांपत्य जखमी

दरम्यान, नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही युवा तरुणांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केंद्रावर हजेरी लावली. यावेळी गेटवरवरच पोलिसांनी त्यांना अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले असता पोलिसां बरोबर त्याची शाब्दिक चकमक झाली.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसह कुटुंबीयांनी रांगेत उभं राहून केलं मतदान; म्हणाले, मते पैशानं विकत घेता येत नाहीत!
IT Raid Agra: चप्पल व्यापाऱ्याच्या घरी छापा, नोटांचा ढीग पाहून अधिकारी चक्रावले, पैसे मोजून मोजून दमले; ३० कोटी जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com