Pune Double Decker Flyover  X
मुंबई/पुणे

Pune : वर मेट्रो, खाली बस धावणार! पुण्यात ११ किमीचा डबलडेकर उड्डाणपूल, पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

Pune Double Decker Flyover : पुणे-अहिल्यानगर मार्गावर दुहेरी उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिकेचं काम गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे.

Yash Shirke

Pune Metro Double Decker Bridge Ramwadi to Wagholi : पुणे-अहिल्यानगर मार्गावर दुहेरी उड्डाणपूल आणि मेट्रोच्या कामाचा प्रश्न अखेर सुटला आहे. या कामाशी संबंधित तिढा सोडवण्यामध्ये यंत्रणांना यश मिळाले आहे. रामवाडी ते वाघोली यादरम्यान मेट्रोचे काम महामेट्रो करणार आहे. त्यासोबत वाहनांसाठी उड्डाणपूलदेखील महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून बांधला जाणार आहे. मेट्रो प्रशासनाने वाघोलीपर्यंत केलेल्या कामाचा खर्च एमएसआयडीसीकडून महामेट्रोला दिला जाणार आहे.

पुणे मेट्रो मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या रामवाडी ते वाघोली मार्गासाठी केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. पाच मार्गावर मेट्रोच्या आखणीत दुहेरी उड्डाणपुलाची उभारणी करण्यासाठी वाघोलीपर्यंतचे काम कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणजेच पूर्वी एमएसआयडीसीने दुहेरी उड्डाणपूलासाठी निविदा काढल्यामुळे कामाचा स्पष्ट मार्ग ठरला नव्हता.

एमएसआयडीसी, महामेट्रो प्रशासन आणि एनएचएआय अधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये रामवाडी ते वाघोली यादरम्यानचा ११.६३ किमीचा डबलडेकर मार्ग महामेट्रोच करणार असल्याचा निर्णय झाला. या प्रकल्पासाठी सुमारे ३,६२६ कोटी रुपये खर्च येणार आहे. पुणे मेट्रो मार्गिकेसह महामार्गाचे कामही डबलडेकर मार्गात येणार असल्यामुळे एकूणच प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे. अतिरिक्त खर्च एमएसआयडीसीकडून दिला जाणार आहे. वाघोलीपुढील काम मात्र एमएसआयडीसी करणार आहे.

सध्या मेट्रोच्या कामांसाठी कर्ज घेण्यात आले आहे. पण उर्वरित पैशांची तरतूद कशी करायची याबाबत लवकरच मुख्य अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बैठक पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल. वनाझ-चांदणी चौक आणि रामवाडी-वाघोली (विठ्ठलवाडी) या मार्गांसाठी एकूण ३,७५६ कोटी ५८ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. हा संपूर्ण उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकृतरित्या मान्य करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Bacchu Kadu : नाही तर सर्व रस्ते जॅम करु...बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम

Tilkut Chutney Recipe : थंडीची चाहूल लागताच बनवा चटकदार तिळकूट चटणी, वाचा कोकणी स्पेशल रेसिपी

Rajinikanth-Dhanush : रजनीकांत-धनुषच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी; पोलिसांकडून तातडीने कारवाई,नेमकं प्रकरण काय?

Diabetes Care: डायबिटीजच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी! सिनॅपिक अ‍ॅसिडमुळे नैसर्गिकरीत्या भरतील जखमा, तज्ज्ञांनी शोधला रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT