Waterlogging In Pune's Wagholi Area Saam TV
मुंबई/पुणे

Pune Rain Video: पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा धुमाकूळ, वाघोलीत रस्त्यावर पाणीच पाणी; वाहनचालकांचे हाल

Heavy Rainfall In Pune: पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे पुण्यातील वाघोली परिसरामध्ये रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुणे शहर (Pune City) आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाला (Pune Rainfall) सुरूवात झाली आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरात सायंकाळपासून पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची तारंबळ उडाली. पुण्यातील वाघोली परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याला नद्याचे स्वरुप आले आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे ट्राफिक जाम झाले आहे. वाहनचालकांना या पाण्यातूनच मार्ग काढत प्रवास काढावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली परिसरामध्ये पुणे महानगर मार्गावर पहिल्याच पावसाने रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे महानगरपालिका यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे . याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला असता ते एकमेकाकडे ढकलाढकल करत असल्याने यातून मार्ग निघत नसल्याचे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.

पुण्यात आज जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता आहे. पुणे शहरासह राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा पुणे वेध शाळेने अंदाज वर्तवला आहे. तर आज आणि उद्या शहरात संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच मुंबईसह पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुणे वेधशाळेकडून येलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, पुण्यात मंगळवारी झालेला पाऊस हा ढगफुटीच होता, अशी माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. पुण्यात काल दोन तासांत ६८.३ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. काल अचानक शहराच्या वरील भागात ढग एकत्र आले आणि मुसळधार पाऊस झाला. कात्रज भागात २३ तर खडकवासला भागात १२ मिली मीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. काल झालेल्या तुफान पावसात पुणेकरांची मात्र चांगलीच तारांबळ झालेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT