Pune News: धक्कादायक! प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या; कात्रज परिसरातील घटना

Married Woman End Her Life In Katraj Area: पुण्यातील कात्रज परिसरात एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याची माहिती मिळतेय.
विवाहित महिलेची आत्महत्या
Married Woman End Her Life In Katraj AreaSaam Tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

कात्रज परिसरातील दरी पुलावरून उडी मारून एका विवाहित महिलेनं जीवन संपवलं आहे. प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची माहिती मिळतेय. याबाबत सविस्तर वृत्त असं की, ही घटना कात्रज परिसरातील जांभूळवाडी येथे एक जून रोजी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पैशांच्या देवाण घेवाणीतून शिरूर तालुक्यातील एका विवाहित महिलेची परपुरुषाशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात (Pune News) झालं. परंतु त्यानंतर प्रियकराने महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या त्रासाला कंटाळून या विवाहित महिलेने कात्रजजवळ दरी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी पतीने तक्रार (वय ४७) दिली (Crime News) आहे.

त्यावरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात रहीम शेख (रा. कागजीपुरा, कसबा पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी शेख याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेखची या विवाहित महिलेची ओळख झाली होती. तिने शेख याच्याकडून पैसे घेतले (Married Woman End Her Life) होते. ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतु त्यानंतर शेखने महिलेला माझ्यासमवेत राहायला न आल्यास कुटुंबीयांना जीवे मारू, अशी धमकी दिली होती. शेख त्रास देत असून, माझी चूक झाली. मला जगण्याची इच्छा राहिली नाही, असे तिने पतीला सांगितले होते.

विवाहित महिलेची आत्महत्या
Husband End Life due to Wife : पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून ३० वर्षीय पतीने जीवन संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

दरम्यान, या महिलेने एक जूनच्या पहाटे चारच्या सुमारास दरी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. याबाबत पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला (Pune Crime News) आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक मिथुन परदेशी करीत आहेत.

विवाहित महिलेची आत्महत्या
Mumbai Police officer ends life : धक्कादायक! मुंबईत पोलीस निरीक्षकाची आत्महत्या, पोलीस वसाहतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com