मुंबईतच्या वाकोल्यातून धक्कादायक समोर आली आहे. मुंबईच्या वाकोल्यात ४२ वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद बनसोडे यांनी आत्महत्या केली आहे. पोलीस वसाहतीच्या टेरेसवर पोलीस निरीक्षक प्रल्हाद बनसोडे यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने पोलिसांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, वाकोला पोलीस स्टेशनमधील ४२ वर्षीय सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद बनसोडे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाकोला येथील वसाहतीच्या इमारतीच्या टेरेसवर मंगळवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बनसोडे यांनी जीवन संपवलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काही दिवसांपूर्वी जळगावमधून मुंबईत बदली झाली होती. कलिना बीडीएस पोलीस स्टेशनला त्यांची बदली झाली होती. पोलीस निरीक्षक प्रल्हाद बनसोडे यांच्या आत्महत्या प्रकरणी वाकोला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
४२ वर्षीय पोलीस निरीक्षक प्रल्हाद बनसोडे यांचं कुटुंब इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होतं. मंगळवारी पाच वाजण्याच्या सुमारास वसाहतीच्या टेरेसवर जाऊन जीवन संपवलं. इमारतीचा वॉचमेन अचानक टेरेसवर गेल्यानंतर बनसोडे यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांनी तातडीने स्थानिक नागरिक आणि वाकोला पोलिसांनी ही माहिती दिली.
बीडमधून जळगावात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रायसोनी इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूटच्या वसतिगृहातातील खोलीत विद्यार्थ्याने जीवन संपवलं.
या विद्यार्थ्याचे प्रथम सत्रातील दोन विषय राहिल्याची माहिती हाती आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. विश्वंभर रत्नाकर खडके असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. विश्वंभर हा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन विद्या शाखेच्या प्रथम वर्षाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.