Train Cancelled Due To Rainfall Saam TV
मुंबई/पुणे

Pune Rain: पुण्यातील पावसाचा फटका रेल्वेसेवेवर, १४ ट्रेन रद्द तर ५ गाड्याच्या मार्गात बदल; वाचा संपूर्ण लिस्ट

Train Cancelled Due To Rainfall: पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या. याचा फटका रेल्वेसेवेवर बसला आहे. अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या.

Priya More
  • पुणे विभागात भूस्खलन झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम

  • १४ ट्रेन पूर्णपणे रद्द करण्यात आल्या

  • ५ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत

  • काही गाड्या पुणे स्थानकापर्यंतच धावणार

सचिन जाधव, पुणे

पुणे विभागातील भूस्खलनामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक महत्त्वाच्या प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर काही गाड्या पुणे स्थानकापर्यंतच धावणार असून काही गाड्या पुण्यातूनच पुढे सुरू करण्यात येणार आहेत. पुणे विभागातील TKW–MHLC आणि मध्य रेषेदरम्यान तसेच UPML मार्गावरील रेल्वे रुळाजवळ झालेल्या भूस्खलनामुळे मध्य रेल्वेला अनेक गाड्यांच्या वाहतुकीत बदल करावे लागले आहेत.

भूस्खलनामुळे पुणे–भुज, भुज–पुणे, पुणे–सोलापूर, सोलापूर–पुणे, पुणे–सीएसएमटी, सीएसएमटी–पुणे यांसह एकूण १४ गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच CSMT–कोल्हापूर ही गाडी CSMT ते कराड दरम्यान रद्द करण्यात आली असून ती कराडपासून पुढे नियोजित वेळेनुसार धावणार आहे. याशिवाय चेन्नई–सीएसएमटी, वेलंकन्नी–दादर, नांदेड–पनवेल, यशवंतपूर–बाडमेर आणि कोयंबतूर–लोकमान्य टिळक टर्मिनस या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

हुबळी–दादर, हैदराबाद–सीएसएमटी आणि सोलापूर–सीएसएमटी या गाड्या पुणे स्थानकापर्यंतच धावतील. तर दादर–हुबळी,सीएसएमटी–सिकंदराबाद आणि सीएसएमटी–सोलापूर या गाड्या पुणे स्थानकावरून पुढील प्रवासासाठी सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय CSMT–नांदेड ही गाडी दोन तास उशिराने, दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सुटणार आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. भूस्खलनानंतर रेल्वे प्रशासनाकडून मार्ग सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परिस्थिती सामान्य होताच रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात येईल,अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT