Mumbai Pune : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई - पुणे ST बस सेवा पूर्णपणे बंद; ५० फेऱ्या रद्द

Mumbai Pune ST Bus Closed : पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे एसटी बस सेवा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. पुणे स्थानकातील सुमारे ५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून हजारो प्रवाशांवर याचा परिणाम झाला आहे.
PUNE-MUMBAI ST BUS SERVICES SUSPENDED AFTER LANDSLIDE; 50 TRIPS CANCELLED
PUNE-MUMBAI ST BUS SERVICES SUSPENDED AFTER LANDSLIDE; 50 TRIPS CANCELLEDSaam Tv
Published On
Summary
  • पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळल्याने एसटी बस सेवा पूर्णपणे बंद

  • पुणे स्थानकातील सुमारे ५० एसटी फेऱ्या रद्द

  • दरड हटविण्याचे काम सुरू

  • प्रवाशांनी प्रवासापूर्वी अधिकृत माहितीनुसार नियोजन करण्याचे आवाहन

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे-मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत पुणे-मुंबई दरम्यानची एसटी बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून प्रवाशांना अत्यावश्यक कारण नसल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरड कोसळल्यानंतर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीचा आढावा घेतला. मार्ग सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) तातडीने पुणे-मुंबई मार्गावरील सर्व बस फेऱ्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पुणे स्थानकातून सुटणाऱ्या अंदाजे ५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

बससेवा बंद झाल्यामुळे पुणे एसटी स्थानकात अनेक बसेस थांबून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रवाशांनी तिकिटे काढूनही सेवा रद्द झाल्याने काही प्रमाणात गैरसोय झाली आहे. दरम्यान, सकाळच्या सत्रात पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या चार एसटी बसेस उर्से टोल नाका परिसरात अडकल्या होत्या. मार्गावरील परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळताच या बसेस पुढे न पाठवता त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पुण्याकडे परत बोलावण्यात आले.

PUNE-MUMBAI ST BUS SERVICES SUSPENDED AFTER LANDSLIDE; 50 TRIPS CANCELLED
Monsoon Tips : पावसाळ्यात घरात पालींचा वावर वाढला? 'हे' उपाय वेळीच करा नाही तर...

सर्व प्रवासी आणि चालक-वाहक सुरक्षित असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरड हटविण्याचे आणि मार्ग पूर्ववत करण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. मात्र, हवामानाची परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या निकषांचा विचार करूनच वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

PUNE-MUMBAI ST BUS SERVICES SUSPENDED AFTER LANDSLIDE; 50 TRIPS CANCELLED
Health Care : जेवल्या जेवल्या लगेच प्रचंड झोप येतेय? तुमच्या ताटातच दडलंय 'हे' मोठं कारण

पुणे-मुंबई मार्ग हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असल्याने या निर्णयाचा हजारो प्रवाशांवर परिणाम झाला आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि प्रवासापूर्वी एसटीच्या अधिकृत माहितीनुसारच नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com