Goregaon To CSMT Local : गोरेगाव-सीएसएमटी लोकल फेऱ्या ३ महिन्यांसाठी राहणार बंद! वाचा नेमकं कारण काय?
Mumbai Goregaon To CSMT Railway Local News

Goregaon To CSMT Local : गोरेगाव-सीएसएमटी लोकल फेऱ्या ३ महिन्यांसाठी राहणार बंद! वाचा नेमकं कारण काय?

Mumbai Goregaon To CSMT Railway Local News : पश्चिम रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी गोरेगाव ते सीएसएमटी लोकल सेवा पुढील तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लाखो मुंबईकर प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
Published on
Summary
  • गोरेगाव ते सीएसएमटी लोकल सेवा ३ महिने बंद

  • पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मेगा ब्लॉक

  • दररोज ३.६२ लाख प्रवाशांवर परिणाम

  • भविष्यात लोकल फेऱ्या वाढण्याची शक्यता

Goregaon To CSMT Local Cancelled For 3 Months News लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुढील ३ महिने गोरेगाव ते सीएसएमटी लोकलसेवा बंद ठेवण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाला गती देण्यासाठी हि सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या नियोजनाला दुजोरा दिला असून लवकरच याची अधिकृत अंमलबजावणी सुरू होईल.

नव्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी वांद्रे आणि खार दरम्यान असलेला जुना रेल्वे पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. सुरुवातीला हे काम ६ महिने चालणार होते, मात्र प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वेने हे नियोजन ३ महिन्यांवर आणले आहे. या प्रकल्पासाठी एकूण ९६४.८४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रकल्पाची अंतिम मुदत डिसेंबर २०२७ पर्यंत आहे.

Goregaon To CSMT Local : गोरेगाव-सीएसएमटी लोकल फेऱ्या ३ महिन्यांसाठी राहणार बंद! वाचा नेमकं कारण काय?
Shocking : शिक्षिकेच्या प्रेमात विद्यार्थी झाला वेडापिसा, प्रपोज केला पण नकार दिला, रागात तिच्या ओठांवरून चाकू फिरवला अन्...

या ब्लॉकमुळे पुढील ३ महिने मुंबईतील लाखो प्रवाशांचे हाल होणार आहेत. रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये कपात केली जाणार असून नागरिकांना त्याला सामोरे जावं लागणार आहे. सध्या गोरेगाव-सीएसएमटी दरम्यान ८८, तर वांद्रे-सीएसएमटी दरम्यान १०६ लोकल फेऱ्या धावतात. दररोज सुमारे ३.६२ लाख प्रवासी या मार्गावरून पश्चिम रेल्वेकडून हार्बर मार्गे प्रवास करतात. ब्लॉक काळात वांद्रे-सीएसएमटी दरम्यान मर्यादित सेवा सुरू ठेवण्याचा रेल्वेचा विचार आहे, मात्र गोरेगाव ते वांद्रे दरम्यान सेवा पूर्णपणे खंडित असेल.

Goregaon To CSMT Local : गोरेगाव-सीएसएमटी लोकल फेऱ्या ३ महिन्यांसाठी राहणार बंद! वाचा नेमकं कारण काय?
Today Weather News : राज्यात शेकोट्या विझल्या, उकाडा वाढला; किमान तापमान वाढीमुळे थंडी गायब; वाचा तुमच्या शहरात आजचे हवामान

या तीन महिन्यांच्या कामानंतर भविष्यात मोठे फायदे मिळतील. पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर चर्चगेट ते बोरीवली आणि विरार दरम्यान लोकल फेऱ्यांची संख्या वाढवता येईल. लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल गाड्या स्वतंत्र मार्गिकेवरून धावतील, ज्यामुळे लोकलच्या विलंबाचा प्रश्न सुटणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या नियोजनाला दुजोरा दिला असून लवकरच याची अधिकृत अंमलबजावणी सुरू होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com