भोर तालुक्यातील पान्हवळ गावात ओढ्याला पूर
७० वर्षीय शेतकरी आनंदा कोंढाळकर वाहून गेले
शेतातील पाणी पाहण्यासाठी गेले असताना घडली घटना
पाय घसरून ते पुराच्या प्रवाहात वाहून गेले
पुण्यात पावसाने हाहाकार केला आहे. या पावसामुळे पुण्यात नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील पान्हवळ गावचा शेतकरी ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. आंबवडे खोऱ्यातील पान्हवळ येथील ७० वर्षीय शेतकरी आनंदा गणपत कोंढाळकर अतिवृष्टीमुळे शेतात शिरलेले पाणी पाहण्यासाठी गेले असताना अचानक शेताच्या बांधावरून पाय घसरून ओढ्यात कोसळले. त्यानंतर ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या भोर तालुक्यातील पान्हवळ गावामध्ये मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आला. ओढ्याला आलेल्या पुरात शेतकरी आनंदा कोंढाळकर वाहून गेले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याबरोबर असणारे चुलत भाऊ सुरेश दिनकर कोंढाळकर यांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही.
त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे भाऊ यांनी आरडाओरडा करून शेजारील नागरिकांना जमा केले तसेच त्यानी स्वतः शर्तीचे प्रयत्न केले. मात्र त्यांना पुराच्या पाण्यातून वाहत जाताना वाचवता आले नाही.
पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या आनंदा कोंढाळकर यांना शोधण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र अद्यापही कोंढाळकर यांचा तपास लागला नसल्याचे स्थानिकाकडून सांगण्यात आले. यानंतर शेतकरी बांधव,तरुणांनी पुराच्या पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या सुरक्षित राहा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.
दरम्यान, पुण्याच्या घाटमाथ्यावर गेल्या पाच दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं भोर मधील भाटघर धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. ५ दिवसांत धरणाचा पाणीसाठा ११ टीएमसीने वाढला. सध्या धरणात ४७ टक्के इतका पाणीसाठा आहे. मागच्या आठवड्यात धरणात केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे पाऊस कधी दाखल होतो याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले होतं. सध्या धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान पाहायला मिळतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.