Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखींचे आगमन होणार आहे. त्यामुळे आज पुण्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत.
Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Traffic Saam Tv
Published On
  • पुण्यात पालखी सोहळ्यानिमित्त प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

  • वाहतूक तीन टप्प्यांत बंद करण्यात आली आहे

  • वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन

  • पालखी मुक्कामासाठी पुणे महापालिकेने वारकऱ्यांसाठी व्यापक सुविधा उभारल्या

सागर आव्हाड, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. आज पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यात आगमन होणार आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यातील पालखी मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. तीन टप्प्यात ही वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त यांनी दिली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी आज पुणे शहरात आहेत. शहरात पालख्यांच्या आगमनापूर्वी बोपखेल फाटा, कळस, विश्रांतवाडी, फुलेनगर, आळंदी रोड जंक्शन, चंद्रमा चौक, सादलबाबा चौक, संगमवाडी रस्ता, वाकडेवाडी, खडकी, पाटील इस्टेट चौक या परिसरातील वाहतूक गुरुवारी पहाटे तीन वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे.

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! रेल्वे रुळाखाली 'अंडरपास' अन् वर 'फ्लायओव्हर'; असा सुटणार वाहतुकीचा वेढा

त्यानंतर गणेशखिंड रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता, जंगली महाराज रस्ता,कर्वे रस्ता या भागातील वाहतूक दुपारी १२ वाजल्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे.तसेच, छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि पेठांच्या परिसरातील वाहतूक सायंकाळी पाच वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी गैरसोय टाळण्यासाठी घराबाहेर पडताना नियोजन करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त यांनी केले आहे. पालखी मार्गाचे लाइव्ह लोकेशन तपासून तुम्ही प्रवासाचा प्लान करू शकता. https://diversion.punepolice.gov.in/palkhi/track यावर तुम्ही लोकेशन चेक करू शकता. गर्दी टाळण्यासाठी पुणेकरांनी आज प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे असे देखील सांगण्यात येत आहे.

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Accident Black Spot: पुणे शहरासह जिल्ह्यात अपघात वाढले! जीवघेणे ६३ ब्लॅक स्पॉट; 'या' रस्त्यांवर होतात सर्वाधिक अपघात

दरम्यान, आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी पुण्यात मुक्कामी असणार आहे. या सोहळ्यासाठी पुणे महापालिका प्रशासन सज्ज झाला आहे. २ दिवस मुक्कामी असणाऱ्या पालखीवेळी १० जुलैला रात्री नऊ वाजता सामुदायिक पसायदान होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने नागरिक कुठूनही सामुदायिक पसायदानामध्ये सहभागी होऊ शकणार आहे.

मंडप व्यवस्थामध्ये सहा अत्याधुनिक जर्मन हंगर लावण्यात आलेत जर्मन हंगरचा प्रदर्शनासाठी पहिल्यांदा वापर करण्यात आलाय. पालिकेच्या १०१ शाळांमध्ये मुक्कामाची सोय करण्यात आली आहे एकूण १९५ ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप व्यवस्था केली आहे. ४० ठिकाणी वैद्यकीय कक्ष ठिकठिकाणी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांसाठी १८० फिजिओथेरपिस्ट ४०० वैद्यकीय किट्स शुद्ध पाण्याचे १५ टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com