अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी
Tukaram Maharaj, Dnyaneshwar Maharaj Palkhi Schedule Ashadhi Wari 2025 : आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी आषाढात पंढरपूरला जातात. टाळ- मृदुंग,भगवी पताका आणि मुखी विठूनामाचा गजर करत वैष्णवांचा मेळा विठूरायांच्या दर्शनासाठी जातो. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून संतांच्या पालख्या विठुरायाच्या दर्शनाला निघतात. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १८ जून २०२५ रोजी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान देहूतून होणार आहे. तर आळंदीतून १९ जून २०२५ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होईल. दोन्ही संस्थानाकडून पालख्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेय.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रवास
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १९ जून रोजी आळंदी येथील दर्शन मंडप इमारतीत पहिला मुक्काम करेल. २० जून रोजी पालखी पुण्यातील भवानीपेठ येथे पोहोचेल. तर २१ जून रोजी पुण्यातच मुक्कामी असेल. २२ जून रोजी पुण्याहून सासवडला प्रवास करताना शिंदे छत्री येथे आरतीसाठी विसावा आणि हडपसर येथे दुपारची विश्रांती होईल. २३ जून रोजी सासवड येथे मुक्काम असेल. २४ जून जेजुरी, २५ जून वाल्हे, २६ जून रोजी लोणंद, २७ जून तरडगाव, २८ जून फलटण आणि २९ जून बरड येथे पालखी थांबेल. ३० जून नातेपुते, १ जुलै माळशिरस, २ जुलै वेळापूर, 3 जुलै भंडीशेगाव आणि 4 जुलै वाखरी येथे मुक्काम होईल.
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रवास
संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून रोजी श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे प्रस्तान करेल. आकुर्डी येथे पहिला मुक्काम असेल. २० तारखेला आकुर्डीमधून निघेल अन् नानापेठ पुणे येथे मुक्कामी असेल. २१ जून रोजी तुकाराम महाराज यांची पालखी निवडुंगा विठ्टळ मंदिरात दिवसभरेल. २२ तारखेला लोणीकारभोर, २३ तारखेला यवत, २४ तारखेला वरवंड, २५ तारखेला उडंबडी गवळ्याची, २६ तारखेला बारमती,२७ जून सणसर, २८ जून निमगाव केतकी, २९ जून इंदापूर,३० जून सराटी,१ जुलै अकलूज, २ जुलै बोरगाव श्रीपूर, ३ जुलै पिराची कुरोली, ४ जुलै वखारी (पंढरपूर) येथे मुक्काम असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.