Shreya Maskar
पुणे जिल्ह्यात लोणावळा- खंडाळा या हिल स्टेशनच्या कुशीत कुणे धबधबा वसलेला आहे. पावसाळ्यात हे ठिकाण स्वर्गाहून सुंदर दिसते.
कुणे धबधबा हा तीन टप्प्यांचा धबधबा आहे. हा धबधबा २०० मीटर (६५० फूट) उंचीवरून खाली कोसळतो.
खंडाळा रेल्वे स्थानकापासून अवघ्या २ किमी आणि लोणावळा रेल्वे स्थानकापासून सुमारे ३.५ किमी अंतरावर कुणे धबधबा वसलेला आहे.
पावसाळा (जून ते सप्टेंबर) हा काळ कुणे धबधब्याला भेट देण्यासाठी योग्य आहे. या काळात आजूबाजूच्या सह्याद्रीच्या टेकड्या दाट आणि टवटवीत हिरव्यागार वनराईने नटतात.
कुणे धबधब्याला गेल्यावर पर्यटकांना झिप-लाइनिंग आणि रॅपलिंग यांचा आनंद घेता येतो. त्यामुळे येथे मित्रांसोबत ट्रिप प्लान कराच.
वन डे पिकनिक आणि फोटोशूटसाठी हे ठिकाण बेस्ट आहे. पावसाळ्यात येथे सुंदर इंद्रधनुष्य देखील दिसते.
तुम्ही मुंबईहून ट्रेनने पुण्याला पोहचा तेथून रिक्षा किंवा बसने कुणे धबधब्यापर्यंत पोहचाल. वीकेंडला येथे गर्दी पाहायला मिळते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.