Shreya Maskar
सध्या मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात वीकेंडला मित्रांसोबत धबधब्यावर ट्रिप प्लान करा.
पांडवकडा धबधबा खारघरमध्ये वसलेला आहे. हा धबधबा३५१ फूट उंचीवरून कोसळतो. येथे तुम्हाला ट्रेकिंगचा देखील आनंद घेता येतो.
कर्जत येथे भिवपुरी धबधबा आहे. खडकाळ कडा आणि दाट हिरवळीतून धबधबा वाहतो. भिवपुरी रोड रेल्वे स्थानकापासून रिक्षाने तुम्ही भिवपुरी धबधब्याजवळ पोहचाल.
भागीरथ धबधब्याला वांगणी धबधबा असेही म्हणतात. हा धबधबा रॉक क्लाइंबिंग व साहसी उपक्रमांसाठी उत्तम आहे.
सह्याद्री पर्वतरांगांमधील १,२०० फूट उंचीचा माळशेज धबधबा धुक्याने वेढलेला आहे. पावसाळ्यात तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता. येथे पक्षीनिरीक्षण करायला नक्की जा.
बदलापूर येथे कोंडेश्वर धबधबा आहे. हा धबधबा एका प्राचीन शिवमंदिराजवळ वसलेला आहे.
चिंचोटी धबधबा तुंगारेश्वर परिसरात लपलेला १०० फूट उंचीचा एक सुंदर धबधबा आहे. येथे पोहोचण्यासाठी दाट जंगलातील वाटेवरून सुमारे दीड ते दोन तासांची ट्रेक करावा लागतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.