Panvel Fort : पनवेलपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला, इतिहासप्रेमींनी वीकेंडला करा भटकंती

Shreya Maskar

पनवेल

पनवेलमध्ये कर्नाळा किल्ला हे ऐतिहासिक ठिकाण आहे. कर्नाळा किल्ल्याला 'फनेल हिल' असेही म्हणतात. पनवेल शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर हे ठिकाण आहे.

Panvel | google

कर्नाळा किल्ला

कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या आत १५ व्या शतकातील कर्नाळा किल्ला हा डोंगरावरील किल्ला वसलेला आहे, जो १,५०० फूट उंचीवर आहे.

Karnala Fort | google

ट्रेकिंग

तुम्ही पहिल्यांदाच ट्रेकिंगचा प्लान करत असाल तर कर्नाळा किल्ला उत्तम पर्याय आहे. पावसाळ्यात येथे सुंदर वातावरण पाहायला मिळते.

Trekking | google

किल्ला कोणी बांधला?

कर्नाळा किल्ला देवगिरीच्या यादवांनी बांधला होता आणि नंतर तुघलक राज्यकर्त्यांनी त्याचा वापर केला. हा किल्ला 'बोर घाटा'वर लक्ष ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा बालेकिल्ला होता. बोर घाट हा कोकण किनारपट्टीला दख्खनच्या पठाराशी जोडणारा एक प्रमुख व्यापारी मार्ग आहे.

Who built the fort? | google

कसं जाल?

तुम्ही ट्रेनने पनवेल स्टेशनला पोहचा. त्यानंतर पनवेल स्टेशन बाहेरून रिक्षा किंवा टॅक्सने कर्नाळा पक्षी अभयारण्याला पोहचा. तेथून पुढे चालत कर्नाळा किल्ल्यावर जा.

how do you go | google

इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये कर्नाळा किल्ला जिंकला. हा महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. वीकेंडला तुम्ही येथे मित्रांसोबत नक्कीच ट्रिप प्लान करू शकता.

History | google

किल्ल्याचा आकार

कर्नाळा किल्ल्याच्या मध्यवर्ती बेसाल्टचा स्तंभ आहे जो वरच्या दिशेने निमुळता होत अंगठ्यासारखा किंवा 'फनेल'सारखा (नरसाळ्यासारखा) आकार घेतो.किल्ल्याचे दोन भाग आहेत, खालचा किल्ला (माची) आणि वरचा बालेकिल्ला.

The size of the fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : कोल्हापूरजवळील थंड हवेचे ठिकाण; पावसाळ्यात खुलतं सौंदर्य, आताच प्लान करा ट्रिप

Kolhapur Tourism | saam tv
येथे क्लिक करा...