Kolhapur Tourism : कोल्हापूरजवळील थंड हवेचे ठिकाण; पावसाळ्यात खुलतं सौंदर्य, आताच प्लान करा ट्रिप

Shreya Maskar

कोल्हापूर

कोल्हापूरजवळ पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे. येथून दरीची विहंगम दृश्ये पाहायला मिळते. येथे तुम्ही पावसाळ्यात वीकेंडला ट्रिप प्लान करा.

Kolhapur | google

पन्हाळा हिल स्टेशन

पन्हाळा हिल स्टेशनवरून दरीची विहंगम दृश्ये पाहायला मिळतात. तसेच मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास जवळून अनुभवता येतो.

Panhala Hill Station | google

निसर्ग सौंदर्य

पन्हाळा हिल स्टेशन कोल्हापूर शहरापासून वायव्येस सुमारे २० किमी अंतरावर, पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ३,१७७ फूट (९७७ मीटर) उंचीवर वसलेले आहे.

Beauty of nature | google

कसं जाल?

मुंबईहून कोल्हापूर स्टेशनला जा. तेथून कोल्हापूर स्थानकाबाहेरून पन्हाळा हिल स्टेशनसाठी रिक्षा किंवा बसने प्रवास करा.

how do you go | google

पन्हाळा किल्ला

पन्हाळा हे प्रामुख्याने भव्य पन्हाळा किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. जो दख्खन प्रदेशातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो.

Panhala Fort | google

कोल्हापूर पर्यटन स्थळे

कोल्हापूरला गेल्यावर अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव, दाजीपूर अभयारण्य, पावनखिंड आणि विशाळगड या ठिकाणांना नक्की भेट द्या.

Kolhapur Tourist Places | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : धबधब्याचं रोमांचक दृश्य पाहायचंय? गगनबावडाजवळील 'हे' ठिकाण जणू स्वर्गच

Gaganbawada Tourism | saam tv
येथे क्लिक करा...