Gaganbawada Tourism : धबधब्याचं रोमांचक दृश्य पाहायचंय? गगनबावडाजवळील 'हे' ठिकाण जणू स्वर्गच

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात तुम्ही फॅमिली ट्रिप प्लान करत असाल तर गगनबावडाजवळील नापणे धबधबा सुंदर लोकेशन आहे.

rainy season | pinterest

गगनबावडा

गगनबावडाजवळील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय धबधबा म्हणजे 'नापणे धबधबा' होय. हा धबधबा वर्षभर वाहतो. तसेच 'नापणे धबधबा' दाट हिरव्यागार जंगलांनी वेढलेला आहे.

Gaganbawada | google

नापणे धबधबा

नापणे धबधब्याला 'शेर्पे-नापणे धबधबा' म्हणूनही ओळखले जाते. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थित आहे.

Napne Waterfall | google

ग्लास स्कायवॉक

नापणे धबधबा महाराष्ट्रातील पहिल्या 'ग्लास स्कायवॉक'साठी (काचेच्या पुलासाठी) प्रसिद्ध आहे, हा पारदर्शक पूल थेट वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर उभारण्यात आला आहे.

Glass Skywalk | google

निसर्गाचा नजारा

ग्लास स्कायवॉक हा २२ मीटर लांबीचा काचेचा पूल थेट धबधब्याच्या प्रवाहावर उभारण्यात आला आहे. तुम्हाला येथे निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.

A view of nature | google

पाण्याचा प्रवाह

या पुलावर अतिशय मजबूत पारदर्शक फरशी बसवण्यात आली आहे, ज्यामुळे पर्यटकांना वेगाने वाहणाऱ्या पाण्यावरून चालण्याचा अनुभव घेता येतो.

water flow | google

पक्षीनिरीक्षण

नापणे धबधब्याच्या आजूबाजूला विविध पक्षी पाहायला मिळतात. हे ठिकाण फोटोशूटसाठी बेस्ट आहे. सप्टेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Bird watching | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : खडकात कोरलेल्या पायऱ्या अन् मजबूत तटबंदी, पुण्यात लपलेला 'हा' किल्ला खूप कमी लोकांना माहितेय

Pune Fort | SAAM TV
येथे क्लिक करा...