Shreya Maskar
निमगिरी किल्ला आणि हनुमंतगड किल्ला हे दोन जुळे किल्ले आहेत. निमगिरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात, सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला आहे.
निमगिरी किल्ला जुन्नर शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर आणि समुद्रसपाटीपासून सुमारे ३,६२५ फूट उंचीवर वसलेला आहे.
तुम्ही जर पहिल्यांदाच ट्रेकिंगचा प्लान करत असाल तर निमगिरी किल्ला उत्तम पर्याय आहे. निमगिरी किल्ल्याच्या ट्रेकची सुरुवात खांडीची वाडी किंवा निमगिरी गावातून होते. ट्रेकसाठी जाण्या-येण्यास सुमारे ३ ते ४ तास लागतात.
असे मानले जाते की, निमगिरी किल्ला आणि त्याचा जुळा किल्ला हनुमंतगड यांची निर्मिती २,००० वर्षांहून अधिक काळापूर्वी सातवाहन राजवटीत झाली होती.
निमगिरी किल्ला ऐतिहासिक काळात जुन्नरला कल्याण बंदराशी जोडणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी वापरला जात असे. नाणेघाट खिंडीतून जाणाऱ्या व्यापारी मार्गांच्या संरक्षणासाठी हा किल्ला होता.
निमगिरी आणि हनुमंतगड ही एकाच डोंगरावरील दोन स्वतंत्र शिखरे आहेत, जी एका लहान नैसर्गिक दरीने किंवा भेगेने एकमेकांपासून वेगळी झाली आहेत.
खडकात कोरलेल्या अद्वितीय पायऱ्या आणि सह्याद्रीचे विहंगम दृश्य येथे अनुभवता येते. निमगिरी किल्ला नैसर्गिक खडकाच्या त्रिकोणी आकाराच्या रचनेवर उभारलेला आहे. प्राचीन काळी खडकात कोरलेल्या पायऱ्या, वीरगळ (शौर्य दर्शवणारे दगडी शिल्प) आणि आसपासच्या सह्याद्रीचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.