Pune Porsche Car Accident Case Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident Case : पुणे ब्रेकिंग! बदलण्यात आलेले रक्ताचे नमुने नक्की कोणाचे? फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Pune Porsche Car Accident Case Case : पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने त्याची आई शिवानी अग्रवालचेचं असल्याचं समोर आलं आहे. फॉरेन्सिक अहवालातून ही माहिती मिळाली आहे.

Sandeep Gawade

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये दररोज नवनवीन अपडेट समोर आले आहेत. अपघाताला जबाबदार अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये ससून रुग्णालयात फेरफार करण्यात आले होते. अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवालला अटक करण्यात आल्यानंतर तिने रक्ताचे नमुने आपलेच असल्याची कबुली दिली होती. आता फॉरेन्सिक विभागाकडूनही त्याला पुष्टी देण्यात आली असून अहवालात रक्ताचे नमुने शिवानी अग्रवाल यांचेचं असल्याचं म्हटलं आहे.

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाचे दोन डॉक्टर, शिपायी आणि अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवालला अटक केली होती. या सर्वांच्या चौकशीमध्ये आणखी दोघांची नावं समोर आली. याप्रकरणी अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

शिवानी अग्रवालला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मास्टरप्लान आखला होता. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून त्या पुणे पोलिसांना गुंगारा देत होत्या. शिवानी अग्रवाल सुरुवातीला लुधियाना त्यानंतर मुंबईमध्ये आल्या होत्या. शिवानी अग्रवाल इतर नंबरवरून काही जणांच्या संपर्कात होती. मोबाईल लोकेशन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी अखेर शिवानी अग्रवालला अटक केली होती.

त्यानंतर ससूनमध्ये बदलण्यात आलेले रक्ताचे नमुने बदलल्याची कबुली त्यांनी दिली होती. आज त्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी फॉरेन्सिक लँबला पाठवण्यात आले होते. फॉरेन्सिक विभागाकडून त्याचा आज अहवाल आला. या अहवालात रक्ताचे नमुने शिवानी अग्रवाल यांचेच असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

SCROLL FOR NEXT