Pune Porsche Car Accident Case Ink Attack saam tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident Case : विशाल अग्रवालवर शाईफेकीचा प्रयत्न; वंदे मातरम् संघटना आक्रमक

Pune Porsche Car Accident Case : पुण्यातील ड्रंक अँण्ड्र ड्राईव्ह प्रकरणात हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर शाई हल्ला झालाय. पुण्यातील वंदे मातरम संघटनेकडून हा शाई हल्ला करण्यात आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे:- पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना आज पुणे पोलिसांकडून न्यायालयात हजर करण्यात येत असताना पुण्यातील वंदे मातरम् संघटनेच्या कडून कोर्टात पोहोचताच विशाल अग्रवाल यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न करण्यात आलं आहे. वंदे मातरम संघटनेच्या ५ते ८ कार्यकर्त्यांनी शाईफेकीचा प्रयत्न केला आहे.

याबाबत वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष सचिन जामगे म्हणाले की, त्या अल्पवयीन मुलावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही शाईफेक आंदोलन केलं आहे. त्या मुलाचे वडील विशाल अग्रवाल याने जर आपल्या मुलाला गाडी दिली नसती, तर दोन निष्पाप बळी गेले नसते. पण त्याने गाडी दिल्याने त्याच्या मुलाने दोन निष्पाप मुलांचा जीव घेतला आहे. अशा या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

दोन्ही पब निर्बंध आणले पाहिजे.पबमध्ये जाणऱ्या लोकांचे ओळखपत्र तपासले पाहिजेत. जी वयोमर्यादा घालून देण्यात त्याचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत,अन्यथा वंदे मारतरम संघटनेने हा फक्त ट्रेलर होता. आरोपीच्या अंगावर शाई पडलीय, त्याचं तोंड काळं करायचं होतं,तो प्रयत्न यशस्वी झालाय, असं संघटनेच्या कार्यकर्त्यांनीं म्हटलंय.

दरम्यान, हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मुलाच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन असूनही पबमध्ये मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या आणखी तिघांच्या मुसक्या आवळल्या. यात कोझी आणि ब्लॅक पबच्या व्यवस्थापक आणि मालकाचा सामावेश आहे. आज पोलिसांनी विशाल अग्रवाल यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले पोलिसांनी कोठडीची मागणी केलीय. विशाल अग्रवाल यांच्याकडून त्यांचे वकील प्रशांत पाटील युक्तिवाद करत आहेत. त्यांच्यासह वकिलांचा मोठी फौज कोर्टात दाखल झाली आहे. विशाल अग्रवाल यांच्यासह नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांच्याविरोधात सुनावणी होणारय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

OPPO Find X9 Series: येणार येणार तुमचा फोटो भारीच येणार! दमदार कॅमेरावाला OPPO Find X9 Series च्या लॉन्चची तारीख आली समोर

Rishab Shetty : 'कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टी पोहचला वाराणसीला, घेतले महादेवाचे दर्शन

Kalyan Crime: धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT