पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्हचे प्रकरण (Pune Drunk And Drive Case) चर्चेत असताना आता मुंबईतील हाय प्रोफाइल ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील मृतांना अद्याप न्याय मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. ही सर्व प्रकरणं अद्यापही कोर्टात प्रलंबित आहेत. जान्हवी गडकरचे २०१५ मधील प्रकरण अद्याप कोर्टात प्रलंबित आहे. तर मार्च २०२३ साली वरळी सी फेसवर जॉगरचा झालेला मृत्यू आणि त्याच महिन्यात बीकेसीत झालेल्या अपघातात ३ वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणाचा खटला तर अद्याप सुरू होणे बाकी आहे.
ही सगळी प्रकरण ड्रंक अँड ड्राईव्हची असून कार चालकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र कोणाला अपघाताच्या काही दिवसांत तर कोणाला काही महिन्यात जमीन मंजूर झाला आहे. सगळे आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात ज्यात निष्पापांना प्राण गमवावे लागले. त्या प्रकरणी उदासिनातेला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुंबईमधील ही प्रकरणं नेमकी कोणती आहे हे आपण जाणून घेणार आहोत...
8 जून 2015 साली फ्री वेवर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता तर 22 वर्षीय सदिया साबूवाला गंभीर जखमी झाली होती. या अपघात प्रकरणी कॉर्पोरेट लॉयर असलेल्या जान्हवी गडकरला सदोष मनुष्यवधाप्रकरणी अटक करण्यात आली होती. जान्हवी गडकर अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत असल्याचा पोलिसांचा दावा होता. अपघातानंतर जान्हवी 58 दिवस अटकेत होती. त्यानंतर मात्र सत्र न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. खटला सध्या न्यायालयात सुरू असून 14 जूनला आरोप निश्चिती होणार आहेत.
19 मार्च 2023 ला वरळी सी फेसवर झालेल्या अपघातात राजलक्ष्मी रामकृष्णन ५७ यांचा मृत्यू झाला होता. राजलक्ष्मी या Altruist टेक्नॉलॉजी कंपनीच्या सीईओ होत्या. याप्रकरणी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा कर्मचारी असलेल्या सुमेर मर्चंटला अटक करण्यात आली होती. दारूच्या नशेत सूमेर मर्चंट कार चालवत असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे. त्याच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढलले होते. आरोपीच्या प्रत्येकी 100 मिलिलीटर रक्तात 137 मिली ग्रॅम अल्कोहोलचा अंश सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
100 मिलिमीटर रक्तात फक्त 30 मिलिग्रॅम अल्कोहोलचा अंश असल्यास कारवाई होत नाही. तसेच दुर्घटनेच्या वेळी कारचा वेग 90 ते 100 दरम्यान असल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. सुमेर मर्चंटविरोधात वरळी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून हा खटला अद्याप सुरू झालेला नाही. अपघाताच्या अवघ्या अडीच महिन्यात सत्र न्यायालयाने मर्चंटला जामीन मंजूर केला असून सध्या तो जामीनावर बाहेर आहे.
7 मार्च 2023 ला वांद्रे कुर्ला संकुलात झालेल्या अपघातात तीन वर्षीय स्वाती चौधरी नावाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. संध्याकाळच्या सुमारास बीकेसीतील नाबार्ड जंक्शनवर सिग्नल लागल्यामुळे का थांबली होती. या कारला समोरून येणाऱ्या लाल फोक्सवॅगन कारने जोरदार धडक दिली होती. या अपघातात स्वातीचे काका आणि त्यांचा मित्र जखमी झाला होता. त्यांच्या कारचे नुकसान झाले होते. या प्रकरणी बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ कार्यकारी अधिकारी असलेल्या विश्वास अट्टवार (५४ वर्षे) यांना अटक झाली होती. दारूच्या नशेत कार चालवत असल्याने सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपघाताच्या केवळ तीन दिवसांत अट्टवारला जामीन मंजूर झाला होता. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असून अद्याप खटला सुरू झालेला नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.