Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना

30 Flamingos Died After Hit By Plane: घोटकोपर परिसरातून आतापर्यंत ३२ फ्लेमिंगोचे मृतदेह सापडले आहेत. सोमवारी रात्री मुंबई एअरपोर्टच्या दिशेने लँडिंग करत असलेल्या विमानाने या फ्लेमिंगो पक्षांना धडक दिली.
Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना
Flamingos Saam Tv
Published On

मुंबईतून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. विमानाच्या धडकेने ३० हून अधिक फ्लेमिंगोचा मृत्यू झाल्याची धक्कादायक ही बातमी बातमी आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. पर्यावरण कार्यकर्त्यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) चौकशीची मागणी केली आहे आणि असा दावा केला आहे की, अशा आपत्तींबद्दलच्या इशाऱ्यांकडे शहरी नियोजनकर्त्यांनी दुर्लक्ष केले आहे. फ्लेमिंगोचा मृत्यू झाल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटकोपर परिसरातून आतापर्यंत ३२ फ्लेमिंगोचे मृतदेह सापडले आहेत. सोमवारी रात्री मुंबई एअरपोर्टच्या दिशेने लँडिंग करत असलेल्या विमानाने या फ्लेमिंगो पक्षांना धडक दिली. 'रेझिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर'चे संस्थापक आणि वन विभागातील मानद वन्यजीव वॉर्डन पवन शर्मा म्हणाले की, घाटकोपरमध्ये काही ठिकाणी मृत पक्षी दिसल्याबद्दल अनेकांना फोन येत होते.

Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना
Navi Mumbai Crime News: २० वर्षीय तरुण आणि २ अल्पवयीन मुलींकडून मॉरेशियन नागरिकाची दगडाने ठेचून हत्या; नवी मुंबईत खळबळ

पवन शर्मा यांनी पुढे असेही सांगितले की, वनविभागाच्या मँग्रोव्ह सेल तसेच रेझिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरच्या पथकांनी शोध मोहिमेदरम्यान सोमवारी रात्री या परिसरात २९ मृत फ्लेमिंगो आढळून आले. मंगळवारी आणखी तीन फ्लेमिंगो मृतावस्थेत सापडले. काही पक्षी जमिनीवर पडल्यानंतर भटक्या कुत्र्यांनी त्यांचे लचके तोडले होते. मृत पक्ष्यांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून प्रोटोकॉलनुसार त्यांच्या मृतदेहाची नंतर विल्हेवाट लावली जाईल.'

Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना
Mumbai Viral Video: चिकन फ्रायच्या जाळीनं काढला गटारातील गाळ, मुंबईतल्या हॉटेलमधील किळसवाणा प्रकार; VIDEO व्हायरल

रेझिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरचे सचिव आणि जीवशास्त्रज्ञ चिन्मय जोशी यांनी सांगितले की, 'विमानतळ प्राधिकरणांनी वन विभाग आणि वन्यजीव तज्ञांच्या सहकार्याने परिस्थितीचे योग्य मूल्यांकन करून वन्यजीव संघर्ष शमन आणि व्यवस्थापन योजनेचे पुनरावलोकन करणे आणि सुधारणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.'

'नॅटकनेक्ट फाऊंडेशन'चे संचालक बी एन कुमार यांनी सांगितले की, 'डीजीसीएला ईमेल पाठवला आहे आणि एमिराती एअरलाइनच्या विमानात पक्षी कसे आदळले आणि वैमानिक होते की नाही हे शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संशोधक मृगांक प्रभू म्हणाले की, 'असे दिसते की फ्लेमिंगो मुंबईहून गुजरातला परतत होते आणि त्यांचा मृत्यू हा मानवजातीसाठी येऊ घातलेल्या संकटांचा इशारा आहे.'

Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना
Mumbai Metro: मालाड स्थानकाचं नाव बदललं, आता 'मोतीलाल ओसवाल मालाड'च्या नावाने ओळखले जाणार हे मेट्रो स्थानक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com