Mumbai Viral Video: चिकन फ्रायच्या जाळीनं काढला गटारातील गाळ, मुंबईतल्या हॉटेलमधील किळसवाणा प्रकार; VIDEO व्हायरल

Sewer Sludge Removed By Chicken Fry Strainer: या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुंबईतील कोणत्या ठिकाणचा आणि कोणत्या हॉटेलमधील आहे याची माहिती समोर आली नाही. पण हा व्हिडीओ पाहून मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे.
Mumbai Viral Video: चिकन फ्रायच्या जाळीनं काढला गटारातील गाळ, मुंबईतल्या हॉटेलमधील किळसवाणा प्रकार; VIDEO व्हायरल
Mumbai Viral VideoSaam TV

मुंबईमध्ये (Mumbai News) नागरिकांच्या आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. कधी समोस्यामध्ये झुरळ सापडणं, पाणीपुरीसाठी अस्वच्छ पाणी वापरणं, गटारामध्ये भाज्या धुणं, सडलेल्या फळांचा ज्यूस बनवणे अशाप्रकारच्या अनेक घटना आणि त्यांचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशामध्ये आता आणखी एक किळसवाणी घटना समोर आली आहे.

एका हॉटेलमध्ये चिकन फ्राय करायच्या जाळीने गटारातील कचरा काढल्याची घटना मुंबईतून समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुंबईतील कोणत्या ठिकाणचा आणि कोणत्या हॉटेलमधील आहे याची माहिती समोर आली नाही. पण हा व्हिडीओ पाहून मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका हॉटेलच्या किचनमध्ये एक व्यक्ती दिसत आहे. निळ्या रंगाचा शर्ट, त्याच रंगाची पँट आणि कॅप घातलेली ही व्यक्ती हॉटेलमध्ये हाऊस किपिंगचे काम करत असल्याचे दिसून येत आहे. हॉटेलच्या किचनमधून जाणाऱ्या गटारावरील झाकण उघडून तो चक्क चिकन फ्राय करायच्या जाळीमध्ये गटारातील गाळ काढताना दिसत आहे. गटारातील घाण तो एका बादलीमध्ये काढतो. कोणी आपल्याकडे पाहत तर नाही ना हे पाहून ही व्यक्ती गटारावरील झाकण झाकते आणि गटारातून काढलेली गाळाची बादली घेऊन तो तिथून निघून जातो.

Mumbai Viral Video: चिकन फ्रायच्या जाळीनं काढला गटारातील गाळ, मुंबईतल्या हॉटेलमधील किळसवाणा प्रकार; VIDEO व्हायरल
Viral Video : आधी महिला भिडल्या मग पुरुषांमध्येही झाली कुटाकुटी; सिटवरून ट्रेनमध्ये तुफान राडा

ज्या जाळीतून त्याने गटारातील गाळ काढला आता त्याच जाळीचा वापर हॉटेलमध्ये चिकन फ्राय करण्यासाठी केला जाणार आहे. या हॉटेलमध्ये खाण्यासाठी आलेल्या काही तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केली आहे. हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला असता तो तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा असा किळसवाणा व्हिडीओ पाहिल्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन काही खायचं की नाही असा प्रश्न आता अनेकांना पडू लागला आहे.

Mumbai Viral Video: चिकन फ्रायच्या जाळीनं काढला गटारातील गाळ, मुंबईतल्या हॉटेलमधील किळसवाणा प्रकार; VIDEO व्हायरल
Grandfather Dance Video: नाद ओ बाकी काय नाय! ढोलकीचा आवाज कानी पडताच आजोबांनी धरला लावाणीवर ठेका; VIRAL VIDEO

अनेकांना हॉटेलमधील जाऊन चमचमीत पदार्थ खायला प्रचंड आवडतात. या पदार्थांसाठी जास्त पैसे देऊन देखील आपल्या वाट्याला जर असे घाणेरड्या पद्धतीने तयार केलेले पदार्थ येत असतील तर ही खूपच वाईट गोष्ट आहे. अनेकदा बऱ्याच हॉटेलमध्ये स्वच्छता राखली जात नाही आणि नागरिकांच्या जीवाशी खेळलं जातं. आता समोर आलेल्या या व्हिडीओनंतर संबंधित हॉटेलविरोधात कारवाई होणार की नाही असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. पण हा व्हिडीओ मुंबईतल्या नेमक्या कोणत्या भागातील आणि कोणत्या हॉटेलमधील आहे याची माहिती समोर आली नाही.

Mumbai Viral Video: चिकन फ्रायच्या जाळीनं काढला गटारातील गाळ, मुंबईतल्या हॉटेलमधील किळसवाणा प्रकार; VIDEO व्हायरल
Jugaad Viral Video: अनोखा जुगाड! पठ्ठ्याने केली चक्क प्रेशर कुकरनं शर्टला इस्त्री; VIDEO VIRAL

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com