Viral Video : आधी महिला भिडल्या मग पुरुषांमध्येही झाली कुटाकुटी; सिटवरून ट्रेनमध्ये तुफान राडा

Kalesh b/w Passengers For Train Seat Video : धावत्या ट्रेनमध्ये सुरु असलेली हाणामारीपाहून अनेकांच्या काळजात धडकी भरली. यांच्यतील भांडणं सोडवण्यासाठी एक व्यक्ती प्रयत्न करत असल्याचं देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Kalesh b/w Passengers For Train Seat Video
Viral VideoSaam TV

सध्या शाळकरी मुलांना मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. सुट्ट्यांमध्ये बरेच मुंबईकर आपल्या गावी जातात, सुट्ट्या एन्जॉय करतात. आता गावी जाण्यासाठी सर्वच लांबच्या ट्रेन आणि बसमध्ये तुफान गर्दी झाली आहे. या गर्दीतून वाट काढत गावी जाण्याची ओढ मनात घेऊन प्रत्येक प्रवाशी प्रवास करत आहे. अशात ट्रेनमध्ये महिलांच्या हाणामारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Kalesh b/w Passengers For Train Seat Video
Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

ट्रेनने गावी जाताना सर्वचजण सिट पकडण्यासाठी धडपड करत असतात. ट्रेन असो किंवा बस सीट पकडताना सर्वजण शर्थीचे प्रयत्न करतात. मात्र सिट कमी आणि माणसं जास्त असल्याने सहाजीकच कुणाला ना कुणाला उभ्याने प्रवास करावा लागणार. अशात सिटसाठी अनेकांची भांडणं देखील होतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये देखील ट्रेनमधील हाणामारी पाहायला मिळाली आहे.

गावी जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये काही प्रवाशी प्रवास करत आहेत. ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडलं असून सर्वजण गावी निघालेत. त्यात दोन गट एकाच ठिकाणी उभे आहेत. या दोन्ही कुटुंबियांमध्ये बसण्यासाठी सिट मिळावी यासाठी धडपड सुरू आहे. याच सिटवरून आधी दोन्ही कुटुंबातील महिलांमध्ये भांडणं आणि नंतर हाणामारी सुरू झाली.

महिलांची हाणामारी पाहून पुरुषही काही गप्प बसले नाहीत. त्यांनी देखील एकमेकांची कॉलर पकडून जोरदार हाणामारी सुरु केली. आता धावत्या ट्रेनमध्ये सुरु असलेली हाणामारी पाहून अनेकांच्या काळजात धडकी भरली. यांच्यतील भांडणं सोडवण्यासाठी एक व्यक्ती प्रयत्न करत असल्याचं देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

ही हाणामारी अनेकांनी आपल्या फोनमध्ये कैद केली आहे. सोशल मीडियावर @Ghar ke Kalesh या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये ही ट्रेन कुठली आहे आणि या व्यक्ती का भांडत आहेत याबाबत माहिती लिहिली आहे.

पटना ते कानपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये ही फ्री स्टाइल हाणामारी झाली आहे. प्रवासात सिटवरून भांडण होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. या आधी देखील अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्याचप्रमाणे आताचा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल होत आहे. ही हाणामारी पाहून नेटकऱ्यांनी देखील यावर अनेक भन्नाट आणि मजेशीर कमेंट केल्या आहेत.

Kalesh b/w Passengers For Train Seat Video
Faf Du Plessis Catch: उडता फाफ! डू प्लेसिसने हवेत झेपावत एका हाताने घेतला भन्नाट झेल- Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com