Maharashtra Politics Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Pune Politics: पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यांनी सोडली साथ, राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

Sharad Pawar And Ajit Pawar: पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे. ३ बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडत अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी घड्याळ हाती घेतलं.

Priya More

Summery -

  • पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.

  • भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश केला.

  • जालिंदर कामठे, मुरलीधर निंबाळकर आणि रोहन सुरवसे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली.

अक्षय बडवे, पुणे

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी आज त्यांच्या उपस्थित काहीजणांचा पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित केला होता. या निमित्ताने अजित पवार यांनी एकाच कार्यक्रमात तीन पक्षातील प्रतिनिधींचे राष्ट्रवादीमध्ये स्वागत केले. यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस अशा तीन पक्षातील मान्यवरांनी अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.

पुणे जिल्ह्यातील दोन जुन्या सहकाऱ्यांची परत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम करण्यासाठी राष्ट्रवादी मध्ये घरवापसी झाली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे आणि जिल्हा भूविकास बँकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला.

पुणे शहर युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देत रोहन सुरवसे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये एन्ट्री घेतली. या निमित्ताने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोर्चा बांधणीला करायला सुरुवात केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागाकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, यवतमाळमध्ये देखील अजित पवार गटाची ताकद चांगलीच वाढली आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसला दुसऱ्यांदा धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रविण देशमुखांनी काँग्रेसची साथ सोडली. ते ५ ऑक्टोबरला अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारकडून लाडक्या बहिणींना दसरा-दिवाळीचं मोठं गिफ्ट; बँक खात्यात पाठवले 10 हजार रुपये|VIDEO

Friday Tips: शुक्रवारी हे पदार्थ खाण टाळा, अन्यथा...

Dhule Police : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत; धुळे पोलिसांकडून कारवाई, दोघे ताब्यात

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

SCROLL FOR NEXT