Maharashtra Politics: पुण्यात भाजपची फिल्डिंग, पण दणका देणार अजित पवार; बड्या नेत्याची होणार घरवापसी

Pune Politics: पुणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते जालिंदर कामठे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार आहेत. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Maharashtra Politics
Ajit Pawar’s masterstroke in Pune politics: Senior BJP leader Jalindar Kamathe to rejoin NCP.saam tv
Published On
Summary
  • पुण्यातील राजकारणात भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

  • अजित पवारांच्या रणनीतीमुळे जालिंदर कामठे राष्ट्रवादीत परतणार आहेत.

  • भाजपमध्ये गेलेले काही मोठे नेते आता राष्ट्रवादीकडे परत येत आहेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या प्रभाग रचना नव्याने करण्यात आल्या मात्र सर्व भाजपच्या सोयीच्या असल्यानं राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलं होतं . पण आता अजितदादांच्या खेळीनं भाजपला दणका बसणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ताकद वाढवण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये लक्ष घालण्यास सुरूवात केलीय.

केंद्रात आणि राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजपकडे नेतेमंडळी जात आहेत. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आणि संजय जगताप दोन बडे नेते मागील काही महिन्यात भाजपच्या गळाला लागले. पण आता अजित पवार यांनी भाजपलाच धक्का देण्याचा निर्धार केलाय. भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे पुन्हा एकदा राष्ट्रवादीत परतणार आहेत.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: ठाकरे बंधूंचं ठरलं! दिवाळीत युती; दोन फॉर्म्युल्यावर चर्चा, कोणत्या भावाला किती जागा मिळणार?

आमदारकीची संधी मिळेल अशा इच्छेने जालिंदर कामठे भाजपमध्ये गेले होते. परंतु त्यांना आमदारकीची उमेदवारी मिळाली नाही. तीन वर्षांपूर्वीच ते घरवापसी करणार होते, परंतु भाजपने पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी करून त्यांना रोखलं होतं. पण पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्धार केलाय. उद्या शुक्रवारी अजित पवार पुण्यात असतील तेव्हा कामठे राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यता आहे.

Maharashtra Politics
Kolhapur Politics: हसन मुश्रीफांनी डाव पलटला; शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या नेत्याला राष्ट्रवादीत आणलं!

राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची ताकद विभागली आहे. यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आपली सत्ता पुणे जिल्हा परिषदेत राखणे आव्हानात्मक बनलंय. पुरंदरमध्येही राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर अजितदादांचे टेन्शन वाढलंय. संभाव्य अडचणी ओळखत राष्ट्रवादीकडून हातपाय हलवले जात आहेत. शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्या गटाकडून केला जात आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com