Maharashtra Politics : काँग्रेसला लागोपाठ दुसरा धक्का! मोठ्या नेत्याने सोडली साथ, हातावर बांधणार राष्ट्रवादीचं 'घड्याळ'

Maharashtra Political News : काँग्रेसचे यवतमाळमधील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On
Summary
  • यवतमाळमध्ये काँग्रेस पक्षाला लागोपाठ दुसरा धक्का

  • जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रविण देशमुखांनी काँग्रेसचा सोडला हात

  • अजित पवार यांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश

संजय राठोड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. जानेवारी २०२६ मध्ये निवडणुका पार पडणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेस पक्षाला यवतमाळमध्ये सलग धक्के बसत असल्याची माहिती समोर आली आहे.

मागच्या आठवड्यात यवतमाळमध्ये काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि माजी सभापती देवानंद पवार यांनी काँग्रेसची साथ सोडली होती. यामुळे काँग्रेसला फटका बसला होता. आता यवतमाळ जिल्ह्यातील आणखी एका नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. हा नेता आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडे तक्रार, अजित पवारांच्या नेत्याला अखेर अटक

मिळालेल्या माहितीनुसा, विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर पक्षाच्या विरोधात काम केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला. यामुळे यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. देवानंद पवार यांच्या पाठोपाठ प्रवीण देखमुख यांनीही साथ सोडल्याने काँग्रेसला सलग दुसरा धक्का बसला आहे.

Maharashtra Politics
Palghar : मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे आमिष, शिंदेंच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल; अटक होणार का?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकत्यांना बळ देणे आवश्यक आहे. काँग्रेस पक्षात न्याय मिळण्याची चिन्हे नाही. माजी मंत्री वसंतराव पुरके आणि आमदार बाळासाहेब मांगूळकर यांच्या आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा देत असल्याचे प्रवीण देशमुख यांनी म्हटले आहे. ५ ऑक्टोबर रोजी अजित पवार गटात देशमुख यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

Maharashtra Politics
Fact Check : अमित शाहांनी मागितला नरेंद्र मोदींचा राजीनामा? ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठी चूक झाली? Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com