Fact Check : अमित शाहांनी मागितला नरेंद्र मोदींचा राजीनामा? ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठी चूक झाली? Video

Viral Satya Video : अमित शाह यांनी मोदींचा राजीनामा मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय...खरंच शाहांनी मोदींचा राजीनामा देण्याची मागणी केलीय का...? काय आहे सत्य?
amit shah narendra modi
amit shah narendra modix
Published On

अमित शाहा मोदींचा राजीनामा मागतायत असं एका व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळतंय...ऑपरेशन सिंदूर ही मोठी चूक होती...त्यामुळे अजित डोवाल आणि मोदींविरोधात शाहा बोलत असल्याचं या व्हिडिओत दाखवण्यात आलंय...पण, खरंच शाहांनी असं विधान केलंय का...? अमित शाहा असं का बोलले...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...

हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय...आणि पाहा, कसे शाहाच मोदींचा राजीनामा मागतायत असा दावा करण्यात आलाय...या व्हिडिओची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, थेट शाहाच म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांचाच व्हिडिओ व्हायरल होत असल्याने आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली...अमित शाहांनी असं विधान केल्याचं कुठेही आढळून आलेलं नाही...त्याची बातमीही कुठे सापडली नाही...मग हा व्हिडिओ नक्की कधीचा आहे याची पडताळणी करत असताना आम्हाला पीआयबीकडून अधिक माहिती मिळाली...

amit shah narendra modi
Kalyan Crime : कल्याण हादरलं! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, ८ जणांवर गुन्हा दाखल

व्हायरल सत्य - साम इन्व्हिस्टिगेशन

  • अमित शाहांनी मोदींचा राजीनामा मागितलेला नाही

  • AIच्या माध्यमातून व्हिडिओतील आवाज काढलाय

  • व्हिडिओतील आवाज अमित शाहांचा नाही

  • दिशाभूल करण्यासाठी एडिटेड व्हिडिओ व्हायरल

amit shah narendra modi
Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का! बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

अमित शाहांची ही मुलाखत एडिट करण्यात आली आणि AI च्या माध्यमातून आवाज काढण्यात आला...थेट गृहमंत्र्यांच्याच मुलाखतीत छेडछाड करून व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केलीय...त्यामुळे आमच्या पडताळणीत शाहांनी मोदींचा राजीनामा मागितल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

amit shah narendra modi
ED Raid : आपच्या महत्वाच्या नेत्याला मोठा धक्का! कोट्यवधींची मालमत्ता जप्त, मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com