Kalyan Crime : कल्याण हादरलं! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, ८ जणांवर गुन्हा दाखल

Kalyan News : कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे.
kalyan crime
kalyan crimex
Published On
Summary
  • कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

  • ८ जणांवर गुन्हा दाखल; ७ जणांना अटक, एका आरोपीचा शोध सुरु

  • आरोपींमध्ये पीडितेचा नातेवाईक असल्याचे उघडकीस

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Kalyan : कल्याणमधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल आठ जणांनी वेळोवळी पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी मुलीचा नातेवाईक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही नर्सिंगची विद्यार्थिनी आहे. या प्रकरणातील आरोपी (जो पीडितेचा नातेवाईक आहे) त्याने सोशल मीडियावर 'बॉयफ्रेंड देतो' असे सांगून मित्रांकडून हे घृणास्पद कृत्य घडवून आणले. जेव्हा पीडित मुलगी गर्भवती राहिली, तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

kalyan crime
Shahid Afridi : शाहीद आफ्रिदी कुत्र्याचं मांस खातो म्हणून सतत भुंकतो, भारताच्या क्रिकेटपटूचा घणाघात

मुलगी गर्भवती असल्याचे समजताच तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. तिच्यावर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक बाब समजल्यानंतर मुलीच्या वडिलांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत नराधमांच्या विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई केली. ८ पैकी ७ जणांना पोलिसांनी अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरु आहे.

kalyan crime
Crime : लैंगिक अत्याचार, खोटं बोलून लग्न केलं अन् धर्मांतर करायला लावलं; लोकप्रिय युट्यूबरविरुद्ध गुन्हा दाखल

सर्व आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने गाडी आणि मोबाईल जप्तीसह पुढील तपासाठी या आरोपींना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील पीडित मुलीच्या वयाबाबत आरोपींच्या वकिलांनी शंका व्यक्त केली आहे. आरोपींच्या वकिलांनी मुलीच्या वयाची चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. आता पोलिसांच्या पुढील तपासाकडे आणि न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

kalyan crime
Donald Trump : हनुमान खोटा देव, आपण ख्रिश्चन आहोत; डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेत्याने तोडले अकलेचे तारे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com