
Shocking : ओळख लपवून महिलेशी मैत्री करणे, तिच्यावर बलात्कार करणे आणि लग्न करुन दुसऱ्या धर्मात धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकणे असे आरोप एका महिलेने लोकप्रिय युट्यूबर मनी मिराज उर्फ रमडी मिराज याच्यावर केले आहेत. गाझियाबादच्या खोडा पोलीस स्टेशनमध्ये महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, मनी मिराजने सुमारे अडीच वर्षांपूर्वी ओळख लपवून तिच्याशी मैत्री केली. मनी मिराज हा युट्यूब चॅनल चालवतो, पीडित महिला त्याच्या चॅनलसाठी काम करते. एके दिवशी तिला कोल्ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ पाजण्यात आले आणि बेशुद्ध अवस्थेत बलात्कार करण्यात आला. जेव्हा ती शुद्धीवर आली आणि तिने विरोध केला. तेव्हा मनीने तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले.
काही दिवसांनी मनी मिराजने तिच्याशी लग्न केले आणि आपल्या घरी घेऊन गेला. घरी गेल्यानंतर, महिलेला त्याची खरी ओळख कळली. हे प्रकरण गुपित म्हणून ठेवण्यासाठी मनी मिराजने पीडित महिलेवर दबाव आणला. या काळात तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार करण्यात आले. दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव आणण्यात आला. तिला गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले, असे पीडित महिलेने तक्रारीपत्रात म्हटले आहे.
मिराजने तिची कमाई लपवून ठेवण्यास सुरुवात केली. त्याने पीडित महिलेकडून लाखो रुपये हिसकावून घेतले. मिराजचे इतर अनेक महिलांशी प्रेमसंबंध आहेत आणि तो आधीच विवाहित होता, त्याला दोन मुले आहेत, असे पीडितने पोलिसांना सांगितले. मी त्याला विरोध करायला सुरुवात केली, तेव्हा त्याने माझ्यावर हल्ला केला आणि माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे पीडिता पोलीस स्थानकामध्ये म्हणाली. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन तपास सुरु करण्यात आला आहे. आरोपी हा युट्यूब चॅनलचा मालक असून त्याच्याशी संबंधित पुरावे तपासले जात आहे. लवकरच कारवाई केली जाईल, असे एसीपी अभिषेक श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.