Cm Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Politics: पुण्यात भाजपकडून मोठी कारवाई, ६९ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

BJP Suspends 69 Office Bearers In Pune Municipal Election: पुणे महानगर पालिका निवडणूक आणि महापौरपदाची निवडणूक पार पडल्यानंतर भाजपने मोठी कारवाई केली आहे. भाजपने पुण्यातील ६९ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले.

Priya More

Summary -

  • पुण्यात भाजपीने मोठी कारवाई केली

  • ६९ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन

  • पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षशिस्त मोडल्याप्रकरणी केली कारवाई

  • प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर करण्यात आली कारवाई

सचिन जाधव, पुणे

पुण्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्याविरोधात जाऊन निवडणुका लढवल्याप्रकरणी भाजपने मोठी कारवाई केली आहे. भाजपने ६९ कार्यकर्त्यांना निलंबित केले आहे. भाजपच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन निवडणुका लढवणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात भाजपने मोठी कारवाई केली. ६९ पदाधिकाऱ्यांचे भाजपने निलंबन केले. यातील अनेक कार्यकर्ते माजी नगरसेवक भाजपचे पदाधिकारी राहिलेले आहेत. अमोल बालवडकर,धनंजय जाधव, किरण बारटक्के सचिन दांगट मोहिनी देवकर उज्वला गौड हरीश परदेशी प्रीतम नागापुरे संगीता ठोसर संदीप लोणकर मधुकर मुसळे यांच्यासह ६९ जणांचे निलंबन केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे. पक्षातील कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, अशा सूचनाही पक्षाकडून केल्या आहेत. भाजपकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनेक पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.

पुणे महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपचे सर्वाधिक ११९ नगरसेवक विजयी झाले. पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची निवड झाली. तर उपमहापौरपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. पुणे शहराला तब्बल ४ वर्षांनंतर आज महापौर आणि उपमहापौर मिळाला. पुणे महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने माघार घेतली. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली. भाजपकडे पूर्ण बहुमत असल्यामुळे मंजुषा नागपुरे पुण्याच्या महापौर झाल्या. तर परशुराम वाडेकर उपमहापौर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Cancer Symptoms: शरीरात हे ४ बदल दिसले तर समजा लिव्हरच्या कॅन्सर झालाय; दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी जीवघेणं

Mahashivratri Upay: महाशिवरात्रीला माता पार्वतीला अर्पण करा 'या' रंगाची साडी, तुमची सर्व संकटे नष्ट होतील

Poha Health Benefits : तुम्ही दररोज नाश्त्याला पोहेच खाल, जाणून घ्या 'हे' ५ जबरदस्त फायदे

BJP vs NCP : भाजप नेत्याचा हत्येचा कट, जयकुमार गोरेंचा दावा, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

दररोज रात्री उशीर जेवत असाल तर शरीरात होऊ लागतात हे बदल

SCROLL FOR NEXT