Mumbai Threat: मुंबईला पुन्हा बॉम्बने उडवून देण्याची धमकी, BMC ला पाठवण्यात आला ईमेल; पोलिस यंत्रणा सतर्क

Mumbai Police: मुंबई महानगर पालिकेला पुन्हा धमकीचा ईमेल आला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जलसाचा देखील या धमकीच्या मेलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेला आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये मुंबईतील महालक्ष्मी, सायन्स आणि आचार्य मेट्रो स्टेशनवर IED बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. २७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान मेट्रो स्थानकांवर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकीही या मेलमधून देण्यात आली आहे.

मुंबई महानगर पालिकेला पुन्हा धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये मुंबई बोलेगा खलीस्तान जिंदाबाद असे लिहिण्यात आले आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जलसाचा देखील या धमकीच्या मेलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. वारंवार धमकी येत असताना अजूनही कोणत्या उपाययोजना नसल्याचे निदर्शनास आले आहे.

26 नोव्हेंबर रोजी महापौर कार्यालयात दुपारी 1:11 वाजता बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली. ई-मेलमध्ये मुंबईत पुढील २ दिवस ग्रेनेड हल्ले करण्याची धमकी देम्यात आली. या मेलमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा आणि १९८४ मधील शीख नरसंहाराचा उल्लेख करण्यात आला आहे. खलिस्तान नॅशनल आर्मी’ आणि ‘बब्बर खालसा’सह काही संघटनांची नावे ई-मेलमध्ये नमूद करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.