Famous Model: बिकिनीवर 'ॐ' चिन्ह असलेला सारोंग गुंडाळणं प्रसिद्ध मॉडेलला पडलं महागात; भारतीय नेटकरी संतापले!

Famous Model: प्रसिद्ध मॉडेल केंडल जेनरने बहामासमधील सुट्टीदरम्यान बिकिनीवर ओम चिन्ह असलेला सारोंग परिधान केला. तिचे फोटो व्हायरल होताच भारतीय नेटकऱ्यांनी धार्मिक भावनांचा मुद्दा उपस्थित करत नाराजी व्यक्त केली.
Famous Model
Famous ModelSaam Tv
Published On: 

Famous Model: अमेरिकन मॉडेल आणि टीव्ही पर्सनॅलिटी केंडल जेनर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या बोल्ड फॅशनमुळे नव्हे, तर तिने परिधान केलेल्या एका कपड्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. बहामासमधील सुट्टीदरम्यान केंडलने काळ्या रंगाच्या बिकिनीवर 'ओम' चिन्ह असलेला पिवळ्या आणि लाल रंगाचा सारोंग परिधान केला होता. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक भारतीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. हिंदू धर्मातील पवित्र प्रतीकाचा फॅशनसाठी वापर करणे योग्य आहे का? असा प्रश्न नेटकरी करत आहेत.

बहामासमधील फोटोंमुळे चर्चेला सुरुवात

केंडल जेनर तिची बहीण काइली जेनरसोबत बहामासला सुट्टीसाठी गेली होती. मॉडेल हेली बीबरचा ३० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी या दोघी बहिणी बहामासमध्ये पोहोचल्या होत्या. या ट्रिपदरम्यान त्यांनी एका याटवर वेळ घालवला. काइलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या सहलीचे काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये दोघी बहिणी एकत्र पोझ देताना दिसत आहेत. यावेळी केंडलने काळ्या रंगाची टू-पीस बिकिनी आणि त्यावर 'ओम' चिन्ह असलेला सारोंग परिधान केला होता. तिच्या याच आऊटफिटमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या.

Famous Model
Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; १० हजारांचे तिकीट काढून घुसले अन् ४.३ लाखांची केली चोरी

भारतीय नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

केंडलच्या या फोटोंवर अनेक भारतीय नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. 'ओम' हे केवळ एखादे डिझाइन किंवा फॅशनसाठी वापरले जाणारे चिन्ह नसून, ते कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतीक आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने फॅशनसाठी काहीही करु नका असे लिहिले, तर आणखी एका नेटकऱ्याने तुझ्या स्टायलिस्टचा सल्ला घेतला पाहिजे होतास. तर, एकाने लिहीले, या चिन्हाचे भारतात खूप महत्व आहे त्याचा असा अनादर योग्य नाही.

Famous Model
Phulwara Movie: नऊवारी साडी, ठसकेबाज अदाकारी अन् लावणीचा साज; 'फुलवरा'मध्ये वैदेही-प्रियदर्शिनींचा मराठमोळा अंदाज

हिंदू धर्मात 'ओम'चे महत्त्व काय?

हिंदू धर्मात 'ओम' किंवा 'ॐ' हे अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक प्रतीक मानले जाते. पूजा, मंत्रोच्चार, ध्यान आणि धार्मिक विधींमध्ये या चिन्हाला विशेष महत्त्व आहे. मांडुक्य उपनिषदात 'अ', 'उ' आणि 'म' या तीन ध्वनींचा संबंध जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि गाढ निद्रा या चेतनेच्या तीन अवस्थांशी जोडला आहे. त्यामुळे 'ओम' हे केवळ धार्मिक चिन्ह नसून हिंदू तत्त्वज्ञानातील महत्त्वाचा भाग मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.