uddhav thackeray saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: पुण्यात मोठा राजकीय भूकंप, पालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या वाटेवर

Pimpari Chinchwad Corporation Election: पिंपरी-चिंचवड महानगर पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते संजोग वाघेरे पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

Priya More

Summary:

  • महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मोठा राजकीय भूकंप झाला

  • पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला

  • संजोग वाघेरे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली

  • आज संजोग वाघेरे मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

महानगर पालिका निवडणुकीदरम्यान पुण्यात मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. पुण्यामध्ये भाजपकडून सुरू असलेल्या ऑपरेशन लोटसला यश मिळताना पाहायला मिळत आहे. पिंपरी- चिंचवड शहरात भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. बड्या नेत्याने शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकला असून ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीदरम्यान भाजपची ताकद वाढली आहे.

शिवसेना शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले संजोग वाघेरे पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. ते आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे त्यांचा प्रवेश होणार असून पिंपरी गाव येथून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. संजोग वाघेरे यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. त्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे महापालिका निवडणुकीदरम्यान शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नुकताच संजोग वाघेरे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर वाघेरे हे भाजपात प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. आज ते भाजपात दाखल होत आहेत. पिंपरी- चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रवेशामुळे शहरात भाजपाची ताकदीमध्ये मोठी वाढणार आहे.

संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे महापौर पद भूषवले आहे. महापालिकेत नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पद तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती. गेल्यावर्षी मावळची लोकसभा निवडणूक देखील त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून लढवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup India Squad : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, गिलचा पत्ता कट, कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे यांच्यासमोर वसंत मोरे करणार पुणे महापालिकेची पोलखोल

Pune : ऑपरेशन लोटसमुळे पुण्यात भूकंप अन् विरोधकांना हादरे, पूर्व अन् पश्चिमेत भाजपकडून करेक्ट कार्यक्रम

Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

Makeup Remover: केमिकल प्रोडक्टने मेकअप काढण्यापेक्षा 'या' घरगुती सामग्रीने काढा मेकअप, चेहऱ्याला नाही होणार त्रास

SCROLL FOR NEXT