Maharashtra Politics: संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुणे येथील सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना पोलिसांनी जाण्यापासून अडवलं आहे. राहुल गांधींची येथे सभा झाली. या सभेसाठी पनवेलहून मावळचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे आले होते.
संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं
Rahul Gandhi NewsSaam Tv
Published On

Sanjog Waghere:

>> नितीन पाटणकर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुणे येथील सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना पोलिसांनी जाण्यापासून अडवलं आहे. राहुल गांधींची येथे सभा झाली. या सभेसाठी पनवेलहून मावळचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे आले होते.

महाविकास आघाडीची सभा सुरू असताना उमेदवार संजोग वाघेरे ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार होते. मात्र राहुल गांधी आल्यानंतर संजोग वाघेरे यांना पोलिसांकडून आतमध्ये सोडण्यास मनाई करण्यात आली. या दरम्यान शिवसेना पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. राहुल गांधींची सभा संपेपर्यंत संजोग वाघेरे यांना स्टेजवर सोडण्यात आले नाही.

संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं
PM Modi: पंतप्रधान मोदी १४ मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज, १३ तारखेला वाराणसीत करणार मोठा रोड शो

⁠आंबेडकरांनी दिलेले संविधान आम्ही बदलू देणार नाही: राहुल गांधी

दरम्यान, या सभेत पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहते की, ''ही संविधानाला वाचवण्याची लढाई आहे. इंडीया आघाडी संविधान वाचवण्यासाठी प्रयत्नशिल आहे तर, मोदी आणि आरएसएस संविधान बदलण्याच्या तयारीत आहेत. ⁠मोदी हे संविधान समाप्त करण्याच्या तयारीत आहेत.''

राहुल गांधी म्हणाले, ''आंबेडकरांनी दिलेले संविधान आम्ही बदलू देणार नाही. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याबाबत मोदी कोणत्याही भाषणात कोठेही बोलत नाहीत. ⁠आम्ही ५० टक्के आरक्षणाची मर्यादा काढून टाकू.''

संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं
Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या आणखी एका उमेदवाराने भरला अर्ज; दरेकरांचं काय?

ते पुढे म्हणाले, ''२२ लोकांना १६ लाख कोटी रुपये मोदींनी दिले. शेतकऱ्यांचे २४ वर्ष कर्ज माफ करत गेले, तर इतके पैसे होतील. ⁠९० अधिकारी आहेत, ते देशाचे बजेट वाटतात. ⁠७ अधिकारी केंद्रात निर्णय घेतात. हीच परीस्थिती महाराषट्र आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये आहे. ⁠आम्ही जातीनिहाय जनगणना करू. सरकारी आणि खाजगी क्षेत्रात कोणत्या जातीचे किती लोक आहेत, याची माहीती जाहीर करू.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com