>> Thackeray Group News
अभिजित देशमुख
कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत ट्विस्ट आणखी वाढलाय. महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केलेली असताना आज ठाकरे गटाचे पदाधिकारी व माजी महापौर रमेश जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत सर्वांनाच धक्का दिलाय. याबाबत बोलताना रमेश जाधव यांनी मला आज सकाळी उद्धव ठाकरे यांचा फोन आला त्यांनी मला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले.
पक्षाकडून एबी फॉर्म मिळेल का? याबाबत विचारले असता त्यांनी स्क्रूटनीच्या दिवशी काय होईल, ते तुम्हाला कळेल, असे सूचक विधान केले. त्यामुळे ठाकरे गटाच्या पक्षश्रेष्ठींना दरेकर यांच्यावर विश्वास नाही का, ठाकरे गटाचे आणखी काही रणनीती आहे का? असे अनेक तर्कवितर्क लढवले जात असून याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
तर वैशाली दरेकर यांनी पक्षाकडून मी अधिकृत उमेदवारी अर्ज भरलाय त्यामुळे उमेदवार मीच असणार, असं ठामपणे सांगितलं. एकंदरीतच ठाकरे गटाकडून दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने वैशाली दरेकर व रमेश जाधव यांच्यामध्ये कोण माघार घेणार, हे आता पहावं लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली दरेकर यांच्या बद्दलची कार्यकर्ते पदाधिकाऱ्याची नाराजी अनेकदा समोर आली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यांनी देखील उघडपणे ही नाराजी व्यक्त केली होती. तर दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे डोंबिवली शहर व विवेक खामकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला होता. हे सगळं घडत असताना दुसरीकडे आज ठाकरे गटाचे पदाधिकारी व माजी महापौर रमेश जाधव यांनी डोंबिवली क्रीडा संकुल येथे उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ठाकरे गटाच्या तंबूत एकच खळबळ उडाली. ठाकरे गटाने एक उमेदवार जाहीर केला असताना दुसरा उमेदवार अर्ज कसा भरू शकतो, असे अनेक तर्कवितर्क लढवलेत जातायत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.