Manasvi Choudhary
लग्नात नवरीचा लूक केवळ स्टाईल आणि ज्वेलरी यावरच नसतो तर तुमची हेअरस्टाईल सुद्धा तितकीच महत्वाची असते.
नवरीसाठी ट्रेडिंग हेअरस्टाईल्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता एकापेक्षा एक भारी या हेअरस्टाईल्स आहे ज्यामुळे तुमचा लूक उठून दिसेल.
केसांचा मोठा अंबाडा बांधून त्याला तुम्ही गजरा माळू शकता लग्नाच्या मुख्य विधीसाठी नऊवारी किंवा काठपदरी साडीवर हा लूक उठून दिसेल.
मेसी बन हेअरस्टाईल सध्या ट्रेंडमध्ये आहे. लेहेंग्यावर तुम्ही अशी मेसी बन हेअरस्टाईल करू शकता. केसांचा युनिक पॅटर्न आहे.
साऊथ इंडियन स्टाईल लांब केसांची वेणी ही देखील हेअरस्टाईल तुम्ही निवडू शकता बनारसी साडी, सिल्क साड्यांवर ही हेअरस्टाईल छान दिसते.
अर्धे केस मोकळे सोडून त्यांना खालच्या बाजूला कर्ल्स करा हळदी किंवा लग्नाच्या संगीतसाठी तुम्ही अशी हेअरस्टाईल निवडू शकता.
केस एकदम सरळ घेऊन त्यांची हाय पोनीटेल करून त्यावर तुम्ही हेअर एक्सरसरीज लावू शकता संगीत किंवा कॉकटेल पार्टीसाठी हा लूक बेस्ट आहे.