Manasvi Choudhary
उन्हाळ्याला सुरूवात होताच सूर्याच्या अतिनील किरणामुळे त्वचा टॅन होते काळी पडते. अशावेळी तुम्ही पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी सोपे उपाय करू शकता
बीटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात यामुळे बीटाचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने मृत त्वचा निघून जाते.
पपईमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी असते जे चेहऱ्यावरचा काळवटपणा दूर करण्यास मदत करते.
मधामध्ये लिंबू पिळून चेहऱ्यावर लावा २० मिनिटांनी चेहरा धुवा यामुळे टॅनिंग कमी होऊन त्वचा उजळते.
बेसन, चिमूटभर हळद आणि थोडे दही एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर सुकेपर्यंत ठेवा आणि मग चोळून काढा यामुळे चेहऱ्याला फायदा होतो.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी असते ज्यामुळे त्वचा उजळते. वाळलेल्या संत्र्याच्या सालाची पावडर दुधात मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा.