Manasvi Choudhary
लग्नात नवरीच्या लूकची सर्वत्र चर्चा असते. लग्नात तुम्ही खास हटके स्टाईल ब्लाऊज लूक करू शकता.
नवरीच्या बॅकलेस ब्लाऊजची स्टाईल तुम्ही करू शकता अत्यंत हटके आणि स्टायलिश हा लूक दिसेल .
बॅकलेस ब्लाऊजवर तुम्ही मोठा गोल किंवा चौकोनी शेप देऊन त्यावर कुंदनचे मोठे लटकन लावू शकता. यामुळे लूक भारीच दिसेल.
ब्लाऊजच्या बॅकलेसला मल्टीपल दोऱ्या स्टाईल तुम्ही करू शकता यामुळे नवरीच्या सौंदर्य खुलून येते. सिल्क साड्यांवर हा लूक भारी दिसतो.
ग्लॅमरस लूकसाठी तुम्ही ब्लाऊजच्या बॅकला व्ही कट असा शेप देऊ शकता यामुळे तुमचा लूक भारी दिसतो.
अनेकांना बॅकलेस घालायला लाज वाटते अशावेळी बॅकलेस ब्लाऊजला तुम्ही नेट लावू शकता यामुळे रॉयल लूक दिसतो.
जर तुम्ही बॅकलैस ब्लाऊज घालत असाल, तर केस पूर्ण मोकळे सोडू नका. 'मेसी बन' (Bun) किंवा 'साईड वेणी' करा, ज्यामुळे ब्लाऊजचे डिझाईन स्पष्ट दिसेल.