Pune Police Transfers  saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Pune Police Transfers List: पुण्यामधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला. पुणे पोलिस दलातील तब्बल १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या पोलिस निरिक्षकांची लिस्ट समोर आली आहे.

Priya More

Summary -

  • पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या

  • बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी जारी केले

  • कोंढवा आणि येरवडा ठाण्याचे निरीक्षक कंट्रोल आणि वाहतूक शाखेत बदली

  • गुन्हे शाखा आणि विशेष शाखेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील झाल्या

अक्षय बडवे, पुणे

पुणे पोलिस दलातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अनेक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा खांदेपालट करण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत.

१७ पोलिस निरीक्षकांपैकी पैकी ६ जण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आहेत. वादग्रस्त ठरलेल्या कोंढवा आणि येरवडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची कंट्रोल आणि वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या अनेक युनिटच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिस निरीक्षकांचे नाव (सध्याचे ठिकाण) आणि नवीन नेमणुकीचे ठिकाण -

१) कांचन जाधव (पोलिस निरीक्षक विश्रांतवाडी पोलिस ठाणे): पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

२) रवींद्र शेळके (पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे): पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

३) माया देवरे (पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे): गुन्हे शाखा

४) सुनील पंधरकर (नियंत्रण कक्ष): पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा

५) विजय टिकोळे (पोलिस निरीक्षक, विशेष शाखा): पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

६) अजय संकेश्वरी (नियंत्रण कक्ष): पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा

७) संतोष सोनवणे (नियंत्रण कक्ष): पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

८) संदीपान पवार (पोलिस निरीक्षक, विशेष शाखा): पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

९) अरुण हजारे (नियंत्रण कक्ष): पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा

१०) गुरुदत्त मोरे (पोलिस निरीक्षक, नांदेड सिटी पोलिस ठाणे): पोलिस निरीक्षक, विशेष शाखा

११) दत्ताराम बागवे (पोलिस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलिस ठाणे): पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

१२) अंजुम बागवान (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा): पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे

१३) मंगेश हांडे: पोलिस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलिस ठाणे

१४) स्मिता वासनिक (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा): पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे

१५) भाऊसाहेब पाटील (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा): पोलिस निरीक्षक, वानवडी पोलिस ठाणे

१६) कुमार घाडगे (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा): पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस ठाणे

१७) प्रदीप कसबे (पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा): पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT