Government Officers Transferred: निवडणुकीपूर्वी 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश; मुंबई महापालिकेत चार नवे सहायक आयुक्त दाखल

Government Officers Transferred: आगामी महानगरपालिका निवडणुकांपूर्वी, भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार, मुंबई महापालिकेत पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि चार नवीन सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Government Officers Transferred
Newly appointed BMC assistant commissioners take charge ahead of civic elections in Mumbai.saam tv
Published On
Summary
  • सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे आदेश दिले.

  • निवडणूक तयारीदरम्यान मुंबई महापालिकेत पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.

  • चार नवे सहायक आयुक्तांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारशीवर झाली.

राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्यात याव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. त्यानंतर सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी उमेदवारांची चाचपणी केली जातेय. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी प्रशासन आणि राज्य निवडणूक आयोग करत आहे. निवडणुकीची तयारी चालू असतानाच नवनियुक्त चार सहायक आयुक्तांच्या पदस्थापनांचे आदेश जारी करण्यात आलेत.

Government Officers Transferred
Local Body Election : गावागावात यंदा राजकीय दिवाळी! झेडपी, पंचायत समिती निवडणुकांचा बार दिवाळीतच फुटणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 'सहायक आयुक्त’ संवर्गातील रिक्त पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेअंती शिफारस केलेल्या चार सहायक आयुक्तांच्या पदस्थापनेचे आदेश देण्यात आलेत. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत आज आदेश जारी केलेत.

Government Officers Transferred
Nashik Police Transfers: नाशिकचा क्राइम रेट वाढला, पोलीस अधिकाऱ्यांना थेट झटका; डझनभर पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

चार आदेश पुढीलप्रमाणे

आरती भगवान गोळेकर - सहायक आयुक्त, आर दक्षिण विभाग

संतोष गोरख साळुंखे - सहायक आयुक्त, सी विभाग

वृषाली पांडुरंग इंगुले - सहायक आयुक्त, एफ दक्षिण विभाग

योगेश रंजीतराव देसाई - सहायक आयुक्त, बी विभाग

Government Officers Transferred
Maharashtra Politics: सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का; आणखी एका राजकीय घराण्यात फूट; आमदार पुत्र भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

बदलीविषयक आदेश पुढीलप्रमाणे

नितीन शुक्ला, सहायक आयुक्त (बी विभाग) तसेच सहायक आयुक्त के पूर्व (अतिरिक्त कार्यभार) - सहायक आयुक्त (के पूर्व विभाग)

संजय इंगळे, सहायक आयुक्त (सी विभाग) - नगर अभियंता विभागाकडे प्रत्यावर्तीत

महेश पाटील, सहायक आयुक्त, एफ दक्षिण विभाग - सहायक आयुक्त, एस विभाग

अलका ससाणे, सहायक आयुक्त, एस विभाग - सहायक आयुक्त, बाजार विभाग

मनीष साळवे, सहायक आयुक्त, आर दक्षिण विभाग - नगर अभियंता विभागाकडे प्रत्यावर्तीत

महानगरपालिकेतील सहायक आयुक्त संवर्गात एकूण 14 उमेदवारांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आली होती. त्यापैकी 6 उमेदवारांची यापूर्वीच सहायक आयुक्त पदावर पदस्थापना करण्यात आलीय. तर आज आणखी चार सहायक आयुक्तांना पदस्थापना देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com